Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाद करायचा नाय! 'आई कुठे..." फेम अभिनेत्रीने चालवला ट्रॅक्टर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 15:17 IST

ट्रॅक्टर चालवताना दिसली मराठी अभिनेत्री, नादखुळा व्हिडिओ होतोय व्हायरल

अश्विनी महांगडे हे टीव्ही जगतातील लोकप्रिय नाव आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अश्विनीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. या मालिकेत तिने साकारलेली 'राणू अक्का' ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अश्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. आगामी प्रोजेक्टची माहिती ती पोस्टद्वारे चाहत्यांना देत असते. अश्विनी अनेक समाजपयोगी कार्यक्रमातही सहभाग घेताना दिसते. 

सध्या अश्विनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अश्विनी चक्क ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. अश्विनीचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. अश्विनीच्या भावाने नुकताच ट्रॅक्टर विकत घेतला आहे. भावाने ट्रॅक्टर घेताच अश्विनीने शोरुम बाहेरच तो चालवल्याचं व्हिडिओत दिसत आहे. अश्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने "स्वराज्य...भावाने ट्रॅक्टर घेतला...नाना आम्ही स्वराज्य वाढवू आणि टिकवू सुद्धा", असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

अश्विनीच्या या व्हिडिओवर कांचन आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी कमेंट केली आहे. "अभिनंदन...ट्रॅक्टर चालवताना कमाल दिसतेस" असं त्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. अश्विनीचा हा नादखुळा व्हिडिओ पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. सध्या अश्विनी 'आई कुठे काय करते' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती अनघा हे पात्र साकारत आहे. 

टॅग्स :अश्विनी महांगडेटिव्ही कलाकारआई कुठे काय करते मालिका