Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : आशुतोषला बायकोकडून ऐकायचेत 'ते' तीन शब्द, "अरुंधती मात्र लाजतच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 09:00 IST

मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच रिलीज झाला.

Aai Kuthe Kay Karte : सध्याची लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' मध्ये धमाल सुरु आहे. एकीकडे इशाच्या लग्नाची तयारी तर दुसरीकडे आशुतोष आणि अरुंधतीचा रोमान्स बहरतोय. त्यातच आशुतोषने अरुंधतीला 'आय लव्ह यू' असं म्हटलंय आणि त्याला आता अरुंधतीकडूनही तेच तीन शब्द ऐकायचे आहेत. अरुंधतीही आशुतोषला प्रेमाचे तीन शब्द बोलणार का हे येत्या एपिसोडमध्ये दिसेल.

स्टार प्रवाहने नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला. यामध्ये अरुंधती स्वयंपाकघरात काम करत असताना आशुतोष तिथे येतो आणि तिला 'आय लव्ह यू' म्हणतो. हे ऐकून अरुंधती लाजते. तो म्हणतो मी माझ्या बायकोलाच तर म्हणतोय त्यात काय लाजायचं. आता तूही म्हण. अरुंधती मात्र लाजते आणि तिला शेवटपर्यंत काही ते बोलता येत नाही. 

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी 'किती गोड' अशा कमेंट्स केल्या आहेत. तर तिकडे अनिरुद्धने संजनाच्या कामाच्या ठिकाणी घातलेल्या तमाशामुळे संजना चिडली आहे. ती अनिरुद्धला कधीच माफ करणार नाही असं दिसतंय. तसंच इशा आणि अनिशचा साखरपुडा निर्विघ्न पार पडतो का हे बघणंही इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारमराठी अभिनेतामधुराणी प्रभुलकर