Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या १७ व्या वर्षी 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर, निवेदिता सराफांसोबत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 09:38 IST

कौतुक करावं तेवढं कमीच! अवघ्या १७ व्या वर्षी अभिनेत्रीने घेतलं स्वकमाईने घर,  या मालिकेत केलंय काम 

Narayani Varne buy New House : आयुष्यात आपलं एखादं हक्काचं घर आणि फिरायला गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यंदाच्या वर्षी मराठी कलाकारांनी कुणी आलिशान गाडी तरी कुणी हक्काच्या घरात पाऊल ठेवलं. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे नारायणी वर्णे. टीव्हीवर बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या नारायणीने इंडस्ट्रीत स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.अशातच  अभिनेत्री नारायणी वर्णे हिने नुकतंच तिचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे.

'एक महानायक बी.आर. आंबेडकर', गणेश कार्तिकेय' यांसारख्या हिंदी मालिका  तसेच 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत',  या मराठी मालिकेमध्ये सुद्धा तिने काम केलं आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत तिने अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. विशेष म्हणजे नारायणी आता १७ वर्षांची आहे. इतक्या कमी वयात तिने तिचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे.नारायणीने नुकतंच तिने मुंबईत स्वत:चं घर घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. 'एक महानायक बी.आर. आंबेडकर' मालिकेतील तिचा सहकलाकार अभिनेता अथर्व कर्वे याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.

अथर्व कर्वेने त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर खास पोस्ट शेअर करत नारायणी वर्णेला टॅग करत लिहिलंय, "आम्ही खऱ्या अर्थाने तुला आमच्या डोळ्यांसमोर वाढताना पाहिले आहे. फक्त १७ वर्षांमध्ये मुंबईत स्वतःचे घर मिळवणे — हे फक्त यश नाही, हे खरी समर्पणाची बाब आहे. तुझ्यावर खूप गर्व आहे आणि हि फक्त सुरवात आहे. अभिनंदन....". यामध्ये नाराणयणीच्या हातात तिच्या नावाची नव्या घराची नंबर प्लेट दिसते आहे.फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या सुंदर घराची झलक पाहायला मिळत आहे.दरम्यान, अभिनेत्रीचं हे यश पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Narayani Varne buys her own house at 17

Web Summary : At just 17, actress Narayani Varne fulfilled her dream of owning a house in Mumbai. Starting as a child artist, she has worked in several TV serials, including with Nivedita Saraf. Her co-star, Atharva Karve, congratulated her on social media.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया