Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गुम है किसी के प्यार में' मालिकेच्या सेटवर लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 17:27 IST

गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीमधील 'गुम है किसी के प्यार में' मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली आहे.

गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीमधील  गुम है किसी के प्यार में मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळते आहे. तर काही कलाकार सेटवर अडकल्याची शक्यता आहे.

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीमधील स्टार प्लस वाहिनीवरील मालिका गुम है किसी के प्यार मेंच्या सेटवर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

 

'गुम है किसी के प्यार मैं' या मालिकेचे शूटिंग सुरू होत असताना सायंकाळी चारच्या सुमारात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. 

काही कलाकार या आगीत अडकले असून काहींना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कलाकार, तंत्रज्ञ यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :आग