Join us
Daily Top 2Weekly Top 5

९ महिने उलटले तरीही डिलिव्हरी झाली नाही, टीव्ही अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली, "४१ आठवडे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 10:52 IST

९ महिन्यांची गरोदर असलेली दृष्टी बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. पण, ४१ आठवडे उलटूनही तिची डिलिव्हरी झालेली नाही. याबाबत तिने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. 

गेल्या काही महिन्यांत कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी गुडन्यूज दिली आहे. मराठीबरोबरच हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आई झाल्या आहेत. मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टी धामीदेखील गरोदर आहे. दृष्टीने काही महिन्यांपूर्वीच ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. ऑक्टोबर महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याचं तिने सांगितलं होतं. मात्र ९ महिने उलटूनही अद्याप अभिनेत्रीची डिलिव्हरी झालेली नाही. याबाबत दृष्टीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

दृष्टी धामी हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. दृष्टी सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांना अपडेट्स देत असते. प्रेग्नंन्सीबाबतही सगळे अपडेट्स ती चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसायची. आतादेखील असाच एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ९ महिन्यांची गरोदर असलेली दृष्टी बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. पण, ४१ आठवडे उलटूनही तिची डिलिव्हरी झालेली नाही. याबाबत तिने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. 

या व्हिडिओत ती म्हणते "४१ आठवडे झाले तरी बेबी नाही". दृष्टीच्या या व्हिडिओवर दिशा परमारने मजेशीर कमेंटही केली आहे. "माझ्या बेबीला घाई होती...३७ व्या आठवड्यातच आली", अशी कमेंट अभिनेत्रीने केली आहे. अनेक चाहत्यांनीही या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. 

दृष्टीने'गीत','मधुबाला','दिल मिल गए','परदेस मे है मेरा दिल' ,'एक था राजा एक थी रानी' या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने 'द एम्पायर','दुरंगा' या वेबसीरिजमध्येही ती झळकली होती. तिने २०१५ साली बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर ९ वर्षांनी आईबाबा होणार असल्यामुळे ते दोघेही आनंदी आहेत. दृष्टी ३८व्या वर्षी तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. 

टॅग्स :दृष्टि धामीटिव्ही कलाकार