Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाहते हैराण, बिग बॉस 17′ मधून 9 स्पर्धक होणार बेघर? मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 12:15 IST

 'बिग बॉस 17' मध्ये सध्या हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे.

 बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. बिग बॉस 17 मध्ये मोठा हंगामा होतोय. लव्ह ट्रँगलमध्ये अडकलेल्या ईशा मालवीय, समर्थ जुरेल आणि अभिषेक कुमार यांचा हाय व्होल्टेज ड्रामा शोमध्ये सुरू आहे. दुसरीकडे, रविवारच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांमध्ये गोंधळ उडाला. मुनव्वर आणि अभिषेकमध्ये कडाक्याचे भांडण झाले. आता काही काही स्पर्धकांचे नाॅमिनेशन झालं आहे. 

'बिग बॉस 17' घरात कॉफी आणि बटर चोरण्यावरून घरातील सदस्यांमध्ये वाद झाला. अंकिताने बटर चोरून बाथरूममध्ये ठेवले, तर मुनव्वरने कॉफी लपवून ठेवली. यावरून त्याचा अभिषेक कुमारसोबत जोरदार वाद झाला. तर बटर लपवल्यामुळे अंकिता आणि अभिषेक एकमेकांशी भिडले. या भांडणात विकी आणि ईशानेही उडी घेतली. रविवारी झालेल्या भांडणामुळे यावेळी तीन-चार नव्हे तर एकूण 9 स्पर्धकांचं नाॅमिनेशन करण्यात आलं आहे. 

बिग बॉसचे क्षणोक्षणी अपडेट्स देणाऱ्या बिग बॉस खबरीने यावेळी 9 स्पर्धकांना नॉमिनेट केले असल्याची माहिती दिली आहे. त्यात अंकिता लोखंडे, नावेद सोल, मनारा चोप्रा, अनुराग डोवाल, ऐश्वर्या शर्मा, समर्थ जुरेल, अरुण महाशेट्टी, नील भट्ट आणि सनी आर्य यांच्या नावांचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यात, बिग बॉस 17 मध्ये, समर्थ आणि मनस्वी ममगाई यांना वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात बोलावण्यात आले होते. तर कमी मत पडल्याने मनस्वी बेघर झाली होती.  त्याचवेळी, सनी आर्याची पत्नी दीपिका आणि राघव शर्मा यांनाही वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याची बातमी आहे.

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजनसेलिब्रिटी