Join us

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी कोकणात पोहोचला कुशल बद्रिके, म्हणतो- "चलो थोडा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:41 IST

मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिकेही चालू वर्षाला निरोप देण्यासाठी आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी सज्ज झाला आहे. 

२०२४ या सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करायला सगळे सज्ज झाले आहेत. दरवर्षी चालू वर्षाला निरोप देताना वर्षाच्या शेवटच्या दिवशी थर्टी फर्स्टला जंगी सेलिब्रेशन केलं जातं. थर्टी फर्स्टला पार्टीचं आयोजनही केलं जातं. सेलिब्रिटीही नव्या वर्षाचं जोरदार स्वागत करत मस्तपैकी थर्टी फर्स्ट साजरा करतात. मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिकेही चालू वर्षाला निरोप देण्यासाठी आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी सज्ज झाला आहे. 

कुशल बद्रिके हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही सक्रिय असतो. करिअरमधील नवीन प्रोजेक्टच्या माहितीबरोबरच तो वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो देत असतो. कुशल बद्रिकेदेखील थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या पार्टीची तयारी करत आहे. थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करण्यासाठी कुशल कोकणात पोहोचला आहे. याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. "चलो थोडा 31st ho जाये…" असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे. 

मध्यमवर्गीय घरातून आलेल्या कुशलने अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. चला हवा येऊ द्या या शोमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. हिंदी कॉमेडी शोमध्येही त्याने काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'पांडू', 'भिरकिट', 'बाप माणूस', 'जत्रा', 'रावरंभा', 'रंपाट', 'बारायण' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे. 

टॅग्स :कुशल बद्रिकेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता