Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रानबाजार'मधील बोल्ड भूमिकेवरुन प्रश्न विचारणाऱ्यांवर तेजस्विनी पंडितने व्यक्त केली नाराजी, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 18:12 IST

Tejaswini Pandit: रानबाजार या वेबसीरिजची जोरदार चर्चा झाली. या सीरिजमधील अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या बोल्ड सीन्सची देखील चर्चेत आले.

रानबाजार (RaanBaazar) या वेबसीरिजची जोरदार चर्चा झाली. या सीरिजमधील अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्या बोल्ड सीन्सची देखील चर्चेत आले. या सीरिजमध्ये तेजस्विनीने देहविक्रेय महिलेची भूमिका निभावली आहे. बोल्ड सीन पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून तिला ट्रोल केले होते. मात्र आता त्यावर तेजस्विनीने प्रतिक्रिया दिली आहे. बोल्ड रोल करून कसं वाटलं, असा प्रश्न जेव्हा मला लोक विचारतात, तेव्हा माझी फार चिडचिड होते. त्यावरून इतकी चर्चा का व्हावी, तेच मला कळत नाही. हे २०२२ आहे, अजूनही अशा गोष्टींकडे नकारात्मकतेने का पाहिले जाते, असा सवाल तेजस्विनीने केला.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री जेव्हा अशा बोल्ड भूमिका करतात, तेव्हा प्रेक्षक नाराज होतात, असे तेजस्विनी म्हणाली. तिने पुढे म्हटले की, मराठी रसिकांची समस्या अशी आहे की जेव्हा एखादी मराठी अभिनेत्री अशा रोल करतात तेव्हा त्यांना काही गोष्टी बोल्ड वाटतात. जर त्यांनी इतर कलाकारांना पाहिलं तर ते बोल्ड वाटणार नाही. अमराठी कलाकार जेव्हा बोल्ड रोल करतात तेव्हा ते नाराजी व्यक्त करत नाहीत. पण हेच मराठी अभिनेत्रीने केले तर ते लगेच नाराजी व्यक्त करतात. हे यामुळे होते असेल कारण प्रेक्षक आम्हाला खूप जवळचे समजतात. 

तेजस्विनी म्हणाली की, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग मानला जातो. पण ते आमचे काम आहे, हे त्यांना समजत नाही. हा अभिनय आहे आणि जसे त्यात विविध घटक आहेत, हे त्यापैकी एक आहे. जर तुम्ही त्याकडे आमच्या दृष्टीकोनातून नाही पाहिलं तर तुम्हाला ते चुकीचेच वाटेल. पण आपण तिथे पोहचू. मराठी रसिकांना तिथे यायला थोडा वेळ लागेल.

टॅग्स :तेजस्विनी पंडितप्राजक्ता माळीरानबाजार वेबसीरिज