Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता' फेम जेनिफर मिस्त्रीच्या बहिणीचं निधन, अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 15:33 IST

'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जेनिफर मिस्त्रीची छोटी बहीण डिंपलचं निधन झालं आहे.

'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जेनिफर मिस्त्रीची छोटी बहीण डिंपलचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर १३ एप्रिलला तिची प्राणज्योत मालवली. अभिनेत्रीने तिच्या बहिणीचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. 

इंडिया टुडेशी संवाद साधताना जेनिफर म्हणाली, "एवढ्या कमी काळात अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. दोन वर्षांपूर्वीच माझ्या भावाचं निधन झालं. त्यानंतर तारक मेहता का उल्टा चष्माचं प्रकरण संपत नाही तर आता माझी बहीणही हे जग सोडून गेली. ती माझ्या खूप जवळ होती. पैसे नसल्याने आम्ही तिला चांगल्या सुविधा देऊ शकलो नाही. पण, कदाचित हीच तिची जाण्याची वेळ असेल." 

काही दिवसांपूर्वीच जेनिफरने बहीण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती दिली होती. जेनिफरच्या बहिणीला सुरुवातीला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु, पैसे नसल्याने तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासूनच तिची प्रकृतीही नाजूक होती. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत जेनिफरने रोशन कौर सोढी ही भूमिका साकारली होती. तिची साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली होती. पण, नंतर अचानक तिने शोमधून एक्झिट घेतली होती. तारक मेहताच्या निर्मात्यांवरही जेनिफरने आरोप केले होते. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकार