Join us

इस्रायलला जाणार होती बबिता? तिकीटाचा फोटो दाखवत म्हणाली, "दिव्य शक्ती आहे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 13:06 IST

इस्त्रायलची परिस्थिती पाहून अभिनेत्री मुनमुन दत्ताने पोस्ट करत लिहिले,

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावाचं वातावरण आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर युद्ध सुरु झालं आहे. बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा कालच इस्त्रायलवरुन सुखरुप मुंबईत परतली. तर आता तारक मेहता फेम बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ताचा (Munmun Dutta) इस्त्रायलला जायचा प्लॅन होता. तिकीटही बुक झाले होते. नशीब चांगलं म्हणून मुनमुन बचावली. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केली आहे. 

इस्त्रायलची परिस्थिती पाहून अभिनेत्री मुनमुन दत्ताने पोस्ट करत लिहिले,"मी याक्षणी इस्त्रायलमध्ये असणार होते या विचारानेच मला शहारे आले आहेत. माझे तिकीट बुक झाले होते पण ही ट्रीप पुढच्या आठवड्यापर्यंत पोस्टपोन झाली. कारण माझे मालिकेत काही सीन्स अॅड झाले आणि नाईट शिफ्ट लांबली. मला फार वाईट वाटत होतं पण आता मला पटलं की दिव्य शक्ती आहे जिने मला मरणापासून वाचवलं.'

तिने पुढे लिहिले,"नशिबाचे कसे आभार मानावे हेच मला कळत नाहीए. देव आहे हेच यातून सिद्ध होतं आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. इस्त्रायलमध्ये शांततापूर्ण वातावरण व्हावं, जगात शांतता यावी अशी मला आशा आहे."

इस्त्रायलवर हल्ला झाला तेव्हा बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा तिथे होती. ती हायफा सोहळ्यात सहभागी झाली होती. हल्ला झाल्यानंतर नुसरतशी काहीच संपर्क होत नसल्याचं टीमचं म्हणणं होतं. मात्र अखेर नुसरत या परिस्थितीतून बचावली आणि तिला भारतात येण्यासाठी फ्लाईट मिळाली. आता मुनमुननेही तिचा हा थरकाप उडवणारा अनुभव सांगितला आहे. 

टॅग्स :मुनमुन दत्तातारक मेहता का उल्‍टा चश्‍माइस्रायल - हमास युद्धइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष