Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'मधून निघताच तान्या मित्तलचं नशीब फळफळलं! एकता कपूरच्या प्रोजेक्टमध्ये मिळाली एन्ट्री? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 17:11 IST

तान्या मित्तल ही बिग बॉस १९ च्या पर्वातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या सदस्यांपैकी एक होती.

Tanya Mittal: सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस १९ च्या पर्वाचा ग्रॅंड फिनाले काल मोठ्या दिमाखात पार पडला. हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता  गौरव खन्ना हा या पर्वाचा विजेता ठरला आहे. दरम्यान, गौरव  या शोचा विजेता ठरला असला तरी, तान्या मित्तलमुळे हा सीझन चांगलाच लक्षात राहील यात शंका नाही. तान्या 'बिग बॉस १९' च्या टॉप ५ स्पर्धकांपैकी एक आहे. 

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर तान्या मित्तल ही तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे चांगलीच चर्चेत राहिली.सुरुवातीपासून तान्या आत्मविश्वासाने घरात वावरताना दिसली. शिवाय बिग बॉसच्या घरात तान्या मित्तलच्या अनेक श्रीमंतीच्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. मात्र, बिग बॉसच्या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचं तिचं स्वप्न भंगलं.परंतु, बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर तान्या मित्तलचं नशीब पालटलं आहे. तिला नव्या प्रोजेक्टची ऑफर मिळाली आहे.

आयएएनएसशी बोलताना तान्याने एकता कपूरच्या अपकमिंग प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याची हिंट दिली आहे. मात्र, हा चित्रपट असेल की मालिका याची माहिती तिने रिव्हिल केलेली नाही. बिग बॉसचं घर गाजवणारी तान्या आता कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत. दरम्यान, तान्या म्हणाली,"मला जे काही चित्रपट आणि प्रोजेक्ट मिळतील ते ती नक्कीच करेन. मला वाटतं माझं करिअर चांगलं होणार आहे." यादरम्यान, तान्याने सलमान खानचंही भरभरुन कौतुक केलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tanya Mittal's luck shines after Bigg Boss; lands Ekta Kapoor project?

Web Summary : After Bigg Boss 19, Tanya Mittal hints at joining Ekta Kapoor's upcoming project. While details are scarce, Tanya expressed optimism about her career and praised Salman Khan. Fans eagerly await her next venture.
टॅग्स :टेलिव्हिजनबिग बॉस १९