Join us
Daily Top 2Weekly Top 5

तैमुरचा हा क्युट फोटो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 11:18 IST

lतैमुरची प्रत्येक 'बाललीला' प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय असतो.

मुंबई: करिना आणि सैफ यांचा मुलगा तैमुर हा एव्हाना सेलिब्रिटी बनला आहे. त्याची प्रत्येक 'बाललीला' प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय असतो. हा, आता तैमुरला दिल्या जाणाऱ्या अवास्तव प्रसिद्धीवरून अनेकजण टीकाही करतात. परंतु, तरीही तैमुरची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. नुकताच त्याचा एक नवा फोटो समोर आला असून तो नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत तैमुरच्या केसांची पोनी टेल बांधलेली दिसते. तसेच त्याच्या हातात सैफ अली खानचा एक फोटो आहे. या फोटोत तैमुर कमालीचा क्युट दिसत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा फोटो झपाट्याने व्हायरल होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सैफ अली खान सध्या काही कामानिमित्त राजस्थानमध्ये गेला आहे. त्यामुळे तैमुर आपल्या बाबांना मिस करत असावा. त्यामुळेच तैमुर सैफचा फोटो पाहत असावा, असा निष्कर्ष नेटकऱ्यांनी काढला आहे. आता यामागचे कारण काहीही असो पण तैमुरचे चाहते हा फोटो बघून खूश झाले आहेत, यामध्ये काही शंका नाही. 

टॅग्स :तैमुरबॉलिवूड