Join us
Daily Top 2Weekly Top 5

Taarak Mehta मधील सचिन श्रॉफ २५ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, जुही परमारसोबत झालाय घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 12:56 IST

रिपोर्टनुसार टीव्ही अभिनेता सचिन श्रॉफ लवकरच दुसरं लग्न करणार आहे.

हँडसम टीव्ही अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) सध्या खूप आनंदी आहे कारण तो त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात चांगल्या टप्प्यात आहे. सध्या सचिन प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये 'तारक मेहता'ची भूमिका साकारत आहे. सचिन त्याच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आला आहे. 25 फेब्रुवारी 2023 रोजी अभिनेता दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार असल्याचे वृत्त आहे.

मीडिया रिपोर्टनुसार  सचिन श्रॉफच्या कुटुंबीयांनी त्याच्या होणाऱ्या वधूची ओळख सीक्रेट ठेवली आहे. रिपोर्टनुसार, लग्नाला उपस्थित असलेल्या एका पाहुण्याने मीडियाला सांगितले की, कुटुंबाला सर्व काही शांततेत घडावे अशी इच्छा आहे. हे अरेंज्ड मॅरेज आहे. मात्र, सचिन श्रॉफ किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून या अभिनेत्याच्या लग्नाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सूत्राने सांगितले की, " सचिनची होणार पत्नी ही इंडस्ट्रीतील नाही. ती एक इव्हेंट आयोजक आणि इंटिरियर डिझायनर आहे. ती अनेक वर्षांपासून सचिनच्या बहिणीची मैत्रीण आहे. लवकरच दोघे लग्न करणार आहेत. मात्र, सचिनने आतापर्यंत त्याच्या लग्नावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अभिनेत्याचे पहिले लग्न अभिनेत्री जुही परमारसोबत झाले होते. मात्र, नऊ वर्षांच्या लग्नानंतर जानेवारी २०१८ मध्ये दोघे वेगळे झाले. त्यांना समायरा 10 वर्षांची मुलगी आहे.  

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकार