Join us

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये नवी एन्ट्री, बिट्टू घेणार का टप्पूची जागा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 17:07 IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah :होय, आता मालिकेत एक नवी एन्ट्री झाली आहे आणि ही एन्ट्री टप्पूची रिप्लेसमेंट असल्याचं मानलं जातंय.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. पण सध्या मात्र चर्चा आहे ती या मालिकेतील कलाकारांची. होय, मालिकेतून दयाबेन दीर्घकाळापासून गायब आहेच. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला आहे. तारक मेहता ही भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वी हा शो सोडला आहे. आता टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनादकट (Raj Anadkat ) यानेही मालिका सोडल्याची चर्चा रंगली आहे. याबद्दल निर्मात्यांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. पण हो, आता मालिकेत एक नवी एन्ट्री झाली आहे आणि ही एन्ट्री टप्पूची रिप्लेसमेंट असल्याचं मानलं जातंय.

नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, गोकुलधामच्या क्लब हाऊसमध्ये कुणीतरी झोपलेलं आढळतं. त्याला उठवल्यावर तो सोढीच्या मित्राचा मुलगा बिट्टू अशी ओळख सांगतो.  सोढी त्याला आनंदाने आपल्या घरी नेतो. पण नंतर सोढीला सुद्धा बिट्टूवर संशय होऊ लागतो. हा बिट्टू कोण हे लवकर कळेलच. पण तूर्तास त्याला पाहिल्यानंतर बिट्टू हा टप्पूला रिप्लेस करणार आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील टप्पू गायब आहे. टप्पू हा मुंबईच्या बाहेर शिक्षण घेण्यासाठी गेला आहे, असं या मालिकेमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे टप्पू ही भूमिका साकारणाऱ्या राजनं ही मालिका सोडली आहे, असं म्हटलं जात आहे. त्याची जागा बिट्टूनं घेतल्याची चर्चा आहे. टप्पूची भूमिका साकारणारा राज 2017पासून   मालिकेत काम करतोय. या आधी अभिनेता भव्य गांधी या मालिकेत  टप्पू साकारत होता.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजन