Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रिअल लाइफमध्ये दिशा वकानी...'; रिटा रिपोर्टरने केला दयाबेनविषयी मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 13:51 IST

Priya ahuja: रिटा रिपोर्टर ही भूमिका साकारणाऱ्या प्रिया आहुजाने अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने दिशा वकानीच्या स्वभावाविषयी एक वक्तव्य करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.

प्रचंड लोकप्रिय आणि गाजलेला कार्यक्रम म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. सध्या हा कार्यक्रम टीआरपीपेक्षा त्यात होणाऱ्या वादविवादांमुळे चर्चेत येत आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी या मालिकेला रामराम केला आहे. यात अभिनेत्री दिशा वकानीने (disha akani) 2017 मध्येच ही मालिका सोडली. मात्र, तिला पुन्हा या मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मालिकेमध्ये दयाबेन परत येणाऱ्याविषयी अनेक चर्चा रंगत असतात. यामध्येच आता मालिकेतील रिटा रिपोर्टरने दयाबेनविषयी एक थक्क करणारं विधान केलं आहे.

या मालिकेत रिटा रिपोर्टर ही भूमिका साकारणाऱ्या प्रिया आहुजाने (priya ahuja) अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने दयाबेन म्हणजे दिशा वकानीच्या स्वभावाविषयी एक वक्तव्य करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. दयाबेन आणि दिशा खऱ्या आयुष्यात एकमेकींपासून प्रचंड वेगळ्या असल्याचं तिने म्हटलं आहे.

"मालिकेत दयाबेन जशी आहे तशी खऱ्या आयुष्यात दिशा अजिबात नाही. दिशा आणि दयाबेन परस्पर विरुद्ध स्वभावाच्या आहेत. दिशा पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये उत्तमरित्या बॅलेन्स सांभाळते. अलिकडेच तिने एका मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या दोन्ही मुलांच्या संगोपनात बिझी आहे," असं प्रिया म्हणाली.

पुढे ती म्हणते, "ती एक उत्तम व्यक्ती आहे. मालिकेत ज्याप्रमाणे तिने दयाबेन साकारली आहे खऱ्या आयुष्यात ती तितक्याच विरुद्ध स्वभावाची आहे. ती प्रचंड शांत आहे. ती खऱ्या आयुष्यात डेलीसोपच्या सुनांप्रमाणे आदर्शन सून आहे."

दरम्यान, या मालिकेत दिशा वकानीला पुन्हा एकदा दयाबेनच्या रुपात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र, या मालिकेत दयाबेन पुन्हा कधी येणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. तसंच अलिकडेच या मालितेून अनेक लोकप्रिय कलाकारांनी काढता पाय घेतला आहे. त्यामुळे ही मालिका सध्या सातत्याने चर्चेत येत आहे.

टॅग्स :दिशा वाकानीतारक मेहता का उल्‍टा चश्‍मासेलिब्रिटीटेलिव्हिजन