Join us

'तारक मेहता'मधून लोकप्रिय अभिनेत्रीने घेतला काढता पाय; साकारत होती 'ही' महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 14:07 IST

Taarak mehta ka ooltah chashmah: एका मुलाखतीमध्ये या अभिनेत्रीने मालिका सोडल्याचं जाहीर केलं आहे.

प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी तारक मेहता का उल्टा चष्मा (taarak mehta ka ooltah chashmah) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. या मालिकेतील अभिनेत्रींनी निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्येच आता एका लोकप्रिय अभिनेत्रीने या मालिकेतून काढता पाय घेतला आहे. याविषयी एका मुलाखतीमध्ये तिने भाष्य केलं आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मामधील प्रिया आहुजा हिने या मालिकेतून काढता पाय घेतला आहे. प्रियाने या मालिकेत रिटा रिपोर्टर ही भूमिका साकारली होती. परंतु, आता तिने ही मालिका सोडली आहे. झूम ला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयी माहिती दिली आहे.

" निर्मात्यांच्या बाजूने मला कोणतंही स्पष्ट उत्तर आलेलं नाही. मी त्यांना शेवटचा मेसेज पाठवला होता. पण, त्यानंतर त्यांनी मला काहीही विचारलं नाही. अगदी माध्यमांमध्येही नाही. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. त्यामुळे आता मी त्या शोचा भाग नाहीये असं मला वाटतंय. म्हणूनच, यापुढे मी तारक मेहताचा भाग नाहीये", असं प्रिया म्हणाली.

दरम्यान, ही मालिका सोडल्यानंतर प्रिया लवकरच एका म्युझिक व्हिडीओत दिसणार आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनसेलिब्रिटी