Taarak Mehta Bapuji Real Look: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमातील बापूजी ही भूमिका खूपच लोकप्रिय झाली आहे. अमित भट्ट (amit bhatt) यांना आपण त्यांच्या खऱ्या नावाने कमी ओळखतो आणि ते साकारत असलेल्या बापूजी या नावाने जास्त ओळखतो. बापूजींच्या भूमिकेत झळकलेले अमित भट रिअल लाइफमध्ये खूपच स्टायलिश आहेत. मेकअपविना तर ते ओळखताही येणार नाहीत.
अमित भट्ट यांनी वयाची ५२ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांनी 'तारक मेहता…' या मालिकेत भूमिका साकारायला सुरुवात केली, तेव्हा ते अवघे ३६ वर्षांचे होते. त्यावेळी अमित यांच्यासमोर दुप्पट वयाची व्यक्तिरेखा साकारण्याचं आवाहन होतं. परंतु त्यांनी लीलया पेललं आणि प्रेक्षकांना कायम हसत-खिदळत ठेवलं. तेव्हापासून अमित भट्ट बापूजींची भूमिका अक्षरशः जगत आले आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण अमित भट प्रत्यक्षात जेठालाल म्हणजेच दिलीप जोशींपेक्षा वयाने लहान आहेत.
अमित यांची पत्नीही खूपच ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले असून, त्यांच्या केमिस्ट्रीला चाहते भरभरून प्रतिसाद देतात. अमित आणि कृतीचे लग्न २७ एप्रिल १९९९ रोजी झालं होतं. कृती व्यवसायाने आहारतज्ज्ञ आहे. अमित आणि त्यांची पत्नी अनेकदा एकत्र ट्रॅव्हल करतानाचे फोटो शेअर करतात, ज्यातून त्यांचं बिनधास्त आणि आनंदी वैवाहिक आयुष्य दिसून येतं.