Join us

तारक मेहताच्या सेटवर टप्पू सेनेलाही नाही सोडलं, 'मुलांना तर...' अभिनेत्रीचा धक्कादायक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 13:14 IST

टप्पू सेनेला नाईट शिफ्ट...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) बाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अभिनेत्री जेनिफर (Jennifer Mistry)आणि मोनिका भदोरिया (Monica Bhadoria) यांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केलेत. आता अभिनेत्री जेनिफरने आणखी एक आरोप करत सर्वांनाच धक्का दिलाय. मालिकेच्या सेटवर टप्पू सेनेलाही टॉर्चर केलं गेल्याचं तिने म्हटलं आहे. यामुळे निर्मात्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेनिफर म्हणाली, "केवळ मोठे कलाकार नाही तर शोमध्ये बाल कलाकार टप्पू सेनेलाही सेटवर टॉर्चर करण्यात आलंय. भव्य गांधी(टप्पू), झील मेहता(सोनू), गोगी(समय शाह), गोली(कुश शाह),पीकू (अजहर शेख) यांचा टप्पू गँगमध्ये समावेश आहे.

जेनिफर मिस्त्री बंसीवालने खुलासा करत सांगितले, "टप्पू सेनेला सकाळी परिक्षा दिल्यानंतरही रात्री काम करण्यास सांगितले जायचे. कित्येकदा ही मुलं सेटवरुन थेट परिक्षा हॉलमध्ये गेली आहेत. पण मुलांना याची सवय झाली होती आणि त्यांना याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता."

ती पुढे म्हणाली, "टप्पू सेनेचा अभ्यास हाच मूळ मुद्दा होता. कधी अॅडजस्ट केलं जायचं पण मला माहितीये कधीकधी त्रासही दिला जायचा.परिक्षांच्या वेळेस बिचारी मुलं नाईट शिफ्टही करायची आणि सेटवरच अभ्यासही करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ला परिक्षेला जायची. मग अनेकदा सेटवरुनच थेट परिक्षेला जायची. या मुलांनी तर खूप सहन केलंय."

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकार