Join us

ओळखलंत का साठीतल्या 'या' बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना?, फोटो पाहून त्यांना ओळखणं ही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 16:49 IST

सिनेमा 'पन्नू सांड की आंख'च्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून त्यांना ओळखणं ही झालंय कठीण झालंय.

ठळक मुद्देअनुराग कश्यप आणि निधी परमार याची निर्मिती करणार आहेत

अभिनेत्री तापसी तिचा आगामी सिनेमा 'पन्नू सांड की आंख'ला घेऊन खूपच उत्साही आहे.  तापसीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिच्यासोबत तिची सहकलाकार भूमी पेडणेकरसुद्धा दिसतेय. यातल्या एका फोटोला तापसीने, काय शिजतंय जीजी ? असे कॅप्शन दिले आहे.  

'सांड की आँख'  जगातील वयस्कर शार्पशूटर असलेल्या चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर या महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. या दोघींची भूमिका तापसी आणि भूमी साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि कथा तुषार हिरानंदानी यांची असणार असून अनुराग कश्यप आणि निधी परमार याची निर्मिती करणार आहेत. 

या चित्रपटाची निर्मिती निधी परमार व अनुराग कश्यप करत आहेत. तर दिग्दर्शन तुषार हिरानंदानी करत आहेत. तापसी व भूमी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.  तापसी व भूमी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. 'सांड की आँख' चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :तापसी पन्नूभूमी पेडणेकर