Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mika Di Vohti Contestant: कोण होणार मिका सिंगची ‘दुल्हनियां’; स्थळ घेऊन आल्यात या एकापेक्षा एक सुंदर मुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 13:58 IST

Mika Di Vohti Contestant: स्टार भारत वाहिनीवर ‘स्वयंवर- मिका दी वोटी’ हा नवा कोरा शो कालपासून सुरू झाला आहे. या शोमध्ये 12 सुंदर तरूणी सहभागी होत आहेत आणि यापैकीच एकीसोबत मिका लग्नगाठ बांधणार आहे.

Mika Di Vohti Contestant:  बॉलिवूडचा लोकप्रिय सिंगर मिका सिंग (Mika Singh) सध्या त्याची आयुष्याची जोडीदार शोधण्याच्या मोहिमेवर निघाला आहे. होय, मिकाचं स्वयंवर होतंय. स्टार भारत वाहिनीवर ‘स्वयंवर- मिका दी वोटी’ हा नवा कोरा शो कालपासून सुरू झाला आहे. या शोमध्ये 12 सुंदर तरूणी सहभागी होत आहेत आणि यापैकीच एकीसोबत मिका लग्नगाठ बांधणार आहे. अर्थात अद्याप 8 जणींचाच चेहरा समोर आला आहे. त्या कोण, हे आज आम्ही सांगणार आहोत.

‘स्वयंवर- मिका दी वोटी’ची पहिली स्पर्धक

मिकाच्या स्वयंवरात नागपूरची अश्लेषा सहभागी झााली आहे. 26 वर्षाची अश्लेषा पेशाने वकील आहे. तिने शोमध्ये एन्ट्री करताच मिकाने तिला एक बुके दिला. तू तर राणी मुखर्जीसारखी दिसतेस, असं मिका तिला म्हणाला. मी वकील आहे, असं तिने सांगितल्यावर, ‘ व्वा, मला गरज पडेल’, असं मिका म्हणाला.

दुसरी आहे मुंबईची बुशरा...

मिकासोबत लग्न करण्याचं स्वप्न घेऊन आलेली दुसरी स्पर्धक आहे मुंबईची बुशरा. ती 24 वर्षांची आहे. बुशराने येताच मिकाला गुडघ्यावर बसून आय लव्ह यू म्हणत प्रपोज केलं. यावर मिका सुद्धा तिला आय लव्ह यू टू म्हणतो. आता ही बुशरा मिकाच्या पसंतीत उतरते का बघूच.

कोलकात्याहून आली चंद्राणी...

मिकाच्या स्वयंवरात सहभागी झालेली तिसरी स्पर्धक आहे चंद्राणी राज. ती कोलकात्यावरून आली आहे. 28 वर्षाची चंद्राणीचा प्रेमावर विश्वास आहे. तिने मिकाला एक पालखी भेट दिली. ती एक आर्टिस्ट आहे.

धमाकेदार ध्वनी

मिकाशी लग्न करण्याचं स्वप्नं घेऊन स्वप्ननगरी मुंबईतील आणखी एक सुंदरी आली आहे. तिचं नाव ध्वनी. ध्वनी 26 वर्षांची आहे. अभिनेत्री, गायिका व व्हाईट ओव्हर आर्टिस्ट असलेली ध्वनी पहिल्याच नजरेत मिकाला आवडली आहे. कभी कभी मेरे अंदर कंगना राणौत भी जाग जाती है, असं ती म्हणते आणि मिका तिला आपला गॉगल गिफ्ट देतो.

बिहारची दिव्या

मिका दी वोटीची पाचवी स्पर्धक बनून एन्ट्री झालीये ती दिव्याची. ती बिहारची आहे. गझल व शायरी लिहिणं हा तिचा छंद आहे पॅशन आहे. दिव्याने शोमध्ये येताच मिकाला सुंदर शायरी ऐकवली आणि मिका ती ऐकून एकदम घायाळ झाला.

सर्वांची लाडकी प्रांतिका

23 वर्षाची प्रांतिका दास ही बबली गर्ल ही सुद्धा मिकाशी लग्न करण्याच्या इच्छेने शोमध्ये आली आहे.

बनारसची सोनल

वाराणसीवरून सोनल अभिनेत्री आहे. आयुष्याचे सर्व निर्णय स्वत: घेणारी सोनल एक क्यूट मुलगी आहे. ती मिकाला कफलिंग्स गिफ्ट देते आणि त्यामागचं कारण ऐकून मिका भावुक होतो.

चंदीगडची नीत

चंदीगडची नीत ही या शोची आठवी स्पर्धक आहे. नेहमी फर्स्ट येणा-या नीतला स्पोर्ट आणि डान्सची आवड आहे.

टॅग्स :मिका सिंगटेलिव्हिजन