Join us

'छावा'बद्दल वादग्रस्त पोस्ट, राज्यभरातून टीकेची झोड, आता शिवाजी महाराजांचं नाव घेत आणखी एक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:59 IST

'छावा'बाबतचं ट्विट वादात, आता शिवाजी महाराजांचं नाव घेत स्वरा भास्करचं आणखी एक ट्विट

Swara Bhasker on Chhaava Movie: सध्या देशभरात 'छावा' (Chhaava) सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) शूर पराक्रमाची गाथा मांडण्यात आली आहे. संभाजी मराहाजांचं कार्य, त्यांचं शौर्य, त्यांचा त्याग पाहून प्रेक्षक रडताना दिसताय. अशातच अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhasker On Chhaava Movie) 'शंभूराजेंवर झालेले अत्याचार काल्पनिक' म्हणत वाद ओढवून घेतला. या वादग्रस्त पोस्टनंतर तिच्यावर चारी बाजूंनी टीकेची झोड उठली.  यानंतर आता स्वरा भास्करने पुन्हा एक ट्विट केलं आहे. आता स्वरानं छत्रपती शिवाजी महाराजाचं (Swara Bhasker On  Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घेत पोस्ट शेअर केली आहे.

 'छावा'बद्दल केलेल्या वादग्रस्त पोस्टवर ट्रोलिंग झाल्यानंतर आता स्वरानं स्पष्टीकरण दिलं आहे. तिनं नवीन ट्विटमध्ये लिहलं, "माझ्या ट्विटमुळे खूप वादविवाद आणि गैरसमज निर्माण झाले आहेत. निःसंशयपणे, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी वारशाचा आणि योगदानाचा आदर करते. विशेषतः सामाजिक न्याय आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांचा. आपल्या इतिहासाचा गौरव करणे चांगली गोष्ट आहे. पण, कृपया सध्याच्या चूका आणि लपवण्यासाठी ऐतिहासिक वैभवाचा गैरवापर करू नका".

पुढे तिनं लिहलं, "इतिहास हा नेहमी लोकांना एकत्र आणण्यासाठी वापरला गेला पाहिजे. लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि सध्याच्या समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी नाही. माझ्या मागील ट्विटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर पश्चात आहे.  इतर कोणत्याही अभिमानी भारतीयांप्रमाणे मलाही आपल्या इतिहासाचा अभिमान आहे. आपल्या इतिहासाने आपल्याला एकत्र केलं पाहिजे आणि चांगल्या आणि अधिक समावेशक भविष्यासाठी लढण्याचं बळ दिलं पाहिजे".

आधी काय म्हणाली होती?'छावा' चित्रपटाच्या संदर्भात स्वरानं ट्विट शेअर करत लिहलं होतं, "गैरव्यवस्थापनामुळं चेंगराचेंगरीत लोकांचे मृत्यू झालेत.  बुलडोझरद्वारे मृतदेह काढावे लागले. यावर शोक व्यक्त न करता आपला समाज ५०० वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक तसंच फिल्मी अत्याचारांवर जास्त  संताप व्यक्त करताना दिसतोय. हा समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय", असं ती म्हणाली होती. तिच्या या ट्विटनंतर तिच्यावर चौफर टीकेची झोड उठली होती.  

टॅग्स :स्वरा भास्करछत्रपती संभाजी महाराजछत्रपती शिवाजी महाराजबॉलिवूड