Join us

मायरा-राघवने केलं बाबांच्या सिनेमाचं प्रमोशन! स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमा'वर क्युट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 13:31 IST

स्वप्नील जोशीने 'नाच गं घुमा' सिनेमाची निर्मिती केली आहे.

परेश मोकाशींचा आगामी 'नाच गं घुमा' (Naach Ga Ghuma) सिनेमा उद्या महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर प्रदर्शित होतोय. स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत यांनी सिनेमाची निर्मती केली आहे. तर मुक्ता बर्वे, नम्रता आवटे आणि सारंग साठे मुख्य भूमिकेत आहेत. सध्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. स्वप्नील जोशीची (Swapnil Joshi) लेक मायरा आणि मुलगा राघव या दोघांनीही 'नाच गं घुमा' गाण्यावर क्युट डान्स केला.  

'नाच गं घुमा' या गाण्यावरील रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वप्नीलची दोन्ही मुलं मायरा आणि राघवलाही मोह आवरलेला नाही. त्या दोघांनी गाण्यावर सुंदर नाच केला आहे. छोटा राघव मोठ्या बहिणीला पाहून तसाच डान्स करण्याचा प्रयत्न करतोय."आमच्या मायरा आणि राघवलाही मोह आवरला नाही !तुम्ही reel केलय की नाही ! नाच गं घुमा ! उद्यापासून थेटरात !" असं कॅप्शन स्वप्नीलने दिलं आहे.

या व्हिडिओवर मुक्ता बर्वे, सुकन्या मोने, नम्रता आवटे, मधुगंधा कुलकर्णी या कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. मायरा आणि राघवचे अनेक रील्स कायम व्हायरल होत असतात.उद्यापासून रिलीज होणारा हा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 

टॅग्स :स्वप्निल जोशीमराठी अभिनेतापरिवारसोशल मीडियामराठी चित्रपट