Join us

सुष्मिता सेनच्या या जिम व्हिडीओची सोशल मीडियात रंगलीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 16:33 IST

सध्या तिचा एक जिम व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत सुष्मिता जिम्नॅस्टिक रिंग्सच्या मदतीने पूशअप करताना दिसत आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही फिटनेसच्या बाबतीत किती सिरीअस आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सुष्मिताच्या फिटनेसच्या चर्चा सोशल मीडियातही रंगलेल्या असतात. सध्या तिचा एक जिम व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत सुष्मिता जिम्नॅस्टिक रिंग्सच्या मदतीने पूशअप करताना दिसत आहे.

सुष्मिताने तिचा हा जिम व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सुष्मिताची फिटनेससाठीची मेहनत पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. एका दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.

हा व्हिडीओ शेअर करत सुष्मिताने लिहीले की, जिम्नॅस्टिक रिंग्ससोबत पहिल्यांदाच पूशअप केले आहेत. या रिंग्ससोबत स्वत:ला नियंत्रित करणे एकप्रकारचा विजय मिळवणे आहे.