Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दिल बेचारा’ची अभिनेत्री संजना सांघी बनली या वर्षाची नंबर 1 ‘ब्रेकआऊट स्टार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 17:41 IST

वाचा, यादीत आणखी कोण कोण

ठळक मुद्देसंजनाने 2011 साली ‘रॉकस्टार’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात रणबीर कपूर व नरगिस फाखरी मुख्य भूमिकेत होते.

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’ची अभिनेत्री संजना सांघीने आयएमडीबी ब्रेकआऊट स्टार 2020 च्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. सुशांतच्या या सिनेमात संजना मुख्य भूमिकेत होती.आयएमडीबी ब्रेकआऊट स्टार 2020च्या यादीत पहिले स्थान मिळाल्याचे पाहून संजनाचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. सोशल मीडियावर स्वत:चा एक हसरा फोटो पोस्ट करत, तिने याबद्दल माहिती दिली आहे. यापेक्षा अधिक मी हसू शकत नाहीये आणि हसणे थांबत नाहीये.या वर्षाची नंबर 1 ब्रेकआऊट स्टार म्हणून मिरवणे एक स्वप्न आहे. मात्र हे श्रेय आधी माझ्या चाहत्यांचे आहे आणि नंतर माझे. तुमच्यामुळेच माझे अस्तित्व आहे, असे तिने लिहिले आहे.

आयएमडीबी ब्रेकआऊट स्टार 2020च्या यादीत संजना सांघी पहिल्या क्रमांकावर आहे. तर अभिनेत्री ईशा तलवार दुसºया क्रमांकावर आहे. यानंतर हर्षिता गौर, स्वस्तिका मुखर्जी व अहाना कुमरा यांनी स्थान मिळवले आहे. हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम 1992’ या वेबसीरिजमध्ये दिसलेली श्रेया धनवंतरी या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. तृप्ती डिमरी, निथ्या मेनन, निहारिका लायरा दत्त यांनीही या यादीत स्थान मिळवले आहे.

संजनाने 2011 साली ‘रॉकस्टार’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात रणबीर कपूर व नरगिस फाखरी मुख्य भूमिकेत होते. संजना यात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. त्याआधी अनेक जाहिरातींमध्ये संजना झळकली होती. ‘दिल बेचारा’ हा लीड हिरोईन म्हणून तिचा पहिला सिनेमा होता. या सिनेमातील तिच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले होते. संजना लवकरच कपिल वर्माच्या ‘ओम- द बॅटल विदइन’ या सिनेमात झळकणार आहे. यात तिच्या अपोझिट आदित्य राय कपूर दिसणार आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतबॉलिवूड