Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत आणि साराच्या केदारनाथ सिनेमाला 5 वर्ष पुर्ण; सारा अली खानची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 14:33 IST

'केदारनाथ' चित्रपटाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.

'केदारनाथ' चित्रपटाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमातून साराने बॉलिवूड पदार्पण केले होते तर सुशांत त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होता. सुशांत आणि सारामध्ये खूप चांगली मैत्री होती. या सिनेमाच्या शूटिंगवेळी त्यांच्या रिलेशनशिपचीही चर्चा रंगली होती. आज सुशांत या जगात नाही, पण त्याच्या आठवणी चाहत्यांसोबत नक्कीच आहेत. यातच साराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

साराने एका चाहत्याची पोस्ट आपल्या स्टोरीवर शेअर करत सिनेमाला अर्धा दशक झाल्याचे म्हटलं. गेल्यावर्षी 2022 मध्ये सारा अली खानने केदारनाथच्या सेटवरील अनेक BTS फोटो शेअर केले होते. सोबत एक हृदयस्पर्शी नोट लिहिली होती. ती म्हणाली होती, 'चार वर्षांपूर्वी माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले. हे अजूनही स्वप्नवत वाटते आणि कदाचित असेच वाटत राहील. मी २०१७ मध्ये परत जाण्यासाठी, या सिनेमातील दृश्य पुन्हा शूट करण्यासाठी, प्रत्येत क्षण पुन्हा जगण्यासाठी, काहीही करायला तयार आहे'.

पुढे ती म्हणाली, 'सुशांतकडून संगीत, सिनेमा, पुस्तकं, आयुष्य, अभिनय, आकाश याविषयी शिकण्यासाठी, प्रत्येक सुर्योदय, सूर्यास्त आणि चंद्रोदयाची साक्ष होण्यासाठी, नदीचा आवाज ऐकण्यासाठी, मॅगी आणि कुरकुरे एन्जॉय करण्यासाठी, चार वाजता उठून तयार होण्यासाठी, गट्टू सरांकडून दिग्दर्शित होण्यासाठी आणि पुन्हा एकदा मुक्कू बनण्यासाठी ती काहीही करायला तयार आहे. आज पौर्णिमेचा चंद्र जेव्हा आज चमकेल, मला माहीत आहे की तेव्हा सुशांत त्याच्या आवडत्या चंद्राजवळ असेल, एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखा तो चमकत असेल, जसा तो नेहमी चमकत होता आणि भविष्यातही असेल. केदारनाथ ते एंड्रोमेडा पर्यंत'. 

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच आदित्य रॉय कपूरसोबत 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटात दिसणार आहे. अनुराग बसू दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्याच्याकडे 'ए वतन मेरे वतन' आणि 'मर्डर मुबारक' हा चित्रपटही आहे. 

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूडसुशांत सिंग रजपूत