साऊथचा सुपरस्टार सूर्या आणि अभिनेता बॉबी देओल यांची प्रमुख भुमिका असलेला 'कांगुवा' चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. रिलीजपूर्वीच या सिनेमाची बरीच चर्चा झाली होती. पण, फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया खूपच थंड होत्या. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाची कामगिरी खूपच खराब झाली. निर्मात्यांना करोडोंचा फटका बसला. या चित्रपटाने प्रभासच्या 'राधे श्याम' सिनेमलापेक्षाही वाईट व्यवसाय केला. त्या चित्रपटाला मागे टाकत हा चित्रपट सर्वात मोठा फ्लॉप ठरला.
24 कोटींचं ओपनिंग मिळालेल्या ''कांगुवा'नं पहिल्या आठवड्यात पिक्चरने 64.3 कोटींची कमाई केली. मात्र दुसऱ्या आठवड्यापर्यंत 'कांगुवा' चित्रपटगृह पूर्णपणे रिकामेच राहिले. या सिनेमानं 19 दिवसांत भारतात एकूण 69 कोटी रुपये आणि जगभरात केवळ 104.2 कोटी रुपये कमावले. बजेटबद्दल बोलायचं झालं तर 'कांगुवा'चं बजेट जवळपास 350 कोटी रुपये होतं. तब्बल 350 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रानं फक्त 104 कोटींची कमाई केली. म्हणजे निर्मात्यांना सुमारे 246 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जी खूप मोठी रक्कम आहे.
यापूर्वी प्रभासच्या बिग बजेट चित्रपट 'राधे श्याम'मुळे निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. या चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये होते. ट्रॅक वेबसाइट Sacnilkनुसार, या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 104 कोटींची कमाई केली होती. याने जगभरात 149.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणजेच या चित्रपटातून निर्मात्यांना जवळपास 151 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.