थिएटरमध्ये प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यानंतर, सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॉर्डर २' आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे. ज्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात पाहता आला नाही, त्यांच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. कारण 'बॉर्डर २' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. याविषयीची अधिकृत माहिती समोर आली आहे. जाणून घ्या 'बॉर्डर २' कधी आणि कुठे बघता येईल?
नेटफ्लिक्सवर होणार प्रीमियर
मिळालेल्या माहितीनुसार, 'बॉर्डर २' हा चित्रपट २० मार्च पासून नेटफ्लिक्स (Netflix) वर स्ट्रीम केला जाणार आहे. २३ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर, अवघ्या दोन महिन्यांच्या आतच हा चित्रपट ओटीटीवर येत आहे. नेटफ्लिक्सच्या इंडिया लिस्टिंगमध्ये, आगामी सिनेमांच्या यादीत 'बॉर्डर २' कधी रिलीज होणार याविषयीची माहिती दाखवण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांना 'बॉर्डर २' सहकुटुंब सहपरिवार हा सिनेमा ओटीटीवर बघता येईल.
'बॉर्डर २' बॉक्स ऑफिस कलेक्शन'बॉर्डर २' ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. सुमारे २७५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ४४९.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाने ३२८.९६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता २० मार्चपासून प्रेक्षकांना आपल्या कुटुंबासह हा देशभक्तीपर चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या सिनेमात सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, अन्य सिंग या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. 'बॉर्डर २'च्या शेवटी पहिल्या भागातील शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली होती.
Web Summary : After a successful theatrical run, 'Border 2' is set to premiere on Netflix from March 20th. The film, starring Sunny Deol, earned ₹449.65 crore worldwide, making it a box office hit.
Web Summary : सफल थिएटर प्रदर्शन के बाद, 'बॉर्डर 2' 20 मार्च से नेटफ्लिक्स पर प्रीमियर के लिए तैयार है। सनी देओल अभिनीत इस फिल्म ने दुनिया भर में ₹449.65 करोड़ कमाए, जिससे यह एक बॉक्स ऑफिस हिट बन गई।