Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनीच्या नव्या सिनेमाची पहिली झलक, तिचा कधीही न पाहिलेला लूक व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 15:59 IST

सनीने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय. या सिनेमात सनी तुम्ही कधीही न पाहिलेल्या रुपात दिसणार आहे.  

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीच्या आगामी साऊथ इंडियन 'वीरमादेवी' सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. सनीने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय. या सिनेमात सनी तुम्ही कधीही न पाहिलेल्या रुपात दिसणार आहे.  

या सिनेमाच्या पोस्टरमध्ये सनी एका राणीच्या रुपात दिसत आहे. ती घोडेस्वारी करत युद्धाला जात आहे. या सिनेमात साकारत असलेली भूमिका सनी पहिल्यांदाच साकारणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे.  

तमिळ आणि तेलगु भाषेत तयार होत असलेला हा सिनेमा मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत रिजीज होणार आहे. या सिनेमासाठी सनीने घोडेस्वारी, तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले. 

सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. तसेच या सिनेमासाठी निर्माते मोठा खर्च करणार असल्याची माहिती आहे. या सिनेमात खास व्हिज्युअल इफेक्ट वापरले जाणार आहेत.

टॅग्स :सनी लिओनीबॉलिवूड