Join us

धर्मेंद्र यांच्या 'त्या' किसींग सीनबद्दल सनी देओल म्हणाला, "त्यांच्याइतकं रोमँटिक कोणी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 16:53 IST

धर्मेंद्र यांच्या रोमँटिक सीन्सबद्दल सनी देओलने कपिल शर्मा शोमध्ये त्याचं खास मत सांगितलंय (sunny deol, dharmendra)

कॉमेडियन कपिल शर्माच्या नवीन शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सनी देओल आणि बॉबी देओल पोहोचले होते. या शोमध्ये कपिल शर्मासोबत सनी पाजी आणि बॉबीने खूप धमाल केली. त्याच वेळी देओल बंधूंनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली. यात संवादादरम्यान बॉबी देओल म्हणाला, "माझ्या वडिलांचा रॉकी और रानी की लव्हस्टोरी हा चित्रपट गेल्या वर्षी आला होता. यात त्यांनी ज्या पद्धतीने ही व्यक्तिरेखा साकारली आहे, ती इतर कोणी साकारली असती असं मला वाटत नाही."

 यानंतर कपिल म्हणाला, "धरम पाजी इतके चांगले आहेत की लोकं त्यांच्या प्रेमात पडतात. जर तुम्हा तिघांना १०० पर्यंत संख्या दिली तर तुमच्या मते सर्वात रोमँटिक कोण आहे?". यावर सनी लगेच म्हणतो, "माझ्या वडिलांची गणना लाखांमध्ये होईल. त्यांच्यापेक्षा रोमँटिक कोणीही असू शकत नाही.' हे ऐकून सगळे हसायला लागतात. आणि सनी देओलने धर्मेंद्र यांचं कौतुक केलं.

धर्मेंद्र यांनी २०२३ मध्ये आलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये शबाना आझमी यांच्यासोबत रोमँटिक भूमिका साकारली. धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची खूप चर्चा झाली.  या शोमध्ये कृष्णा अभिषेकने 'ॲनिमल'मधील रणविजयची भूमिका साकारून देओल बंधूंचे मनोरंजन केले. याशिवाय बॉबीने सुनील ग्रोवरसोबत ॲनिमलमधील त्याचे 'जमाल कुडू' गाणेही रिक्रिएट केले आहे. कपिल शर्माच्या शोचा नवीन एपिसोड नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

टॅग्स :सनी देओलधमेंद्रबॉबी देओल