Join us

ऐकावं ते नवलच..! अनिल कपूर शिवायच हनीमूनला गेली होती पत्नी सुनीता कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 15:46 IST

बॉलिवूडचा सर्वात स्टायलिश अभिनेता अनिल कपूर (Anil kapoor birthday)चा आज वाढदिवस आहे.

बॉलिवूडचा सर्वात स्टायलिश अभिनेता अनिल कपूर (Anil kapoor birthday)चा आज वाढदिवस आहे. आज सोशल मीडियावर बॉलिवूड अनेक सेलिब्रिटींनी अनिल कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज अनिल कपूरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्याशी संबंधित आम्ही काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. अनिल कपूर व सुनीता यांनी लग्नाआधी 10 वर्षे एकमेकांना डेट केले आणि एकदिवस अचानक लग्न केले. एका मुलाखतीत अनिलने त्याच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते.

अनिलने सांगितले होते की, माझ्या एका मित्राने सुनीताला माझा नंबर दिला होता. जेणेकरून ती मला प्रँक कॉल करू शकेल. एकदा आम्ही बोललो आणि तिचा आवाज ऐकून मी तिच्यावर भाळलो. काही आठवड्यानंतर आम्ही एका पार्टीत भेटलो. ती आमची पहिली भेट होती. पण सुनीतामध्ये असे काही होते की, मी तिच्याकडे आकर्षित झालो. आम्ही मित्र बनलो. त्यावेळी माझे ब्रेकअप झाले होते, ही गोष्टही मी तिच्याशी शेअर केली होती. यानंतर आम्ही कधी एकमेकांना डेट करू लागलो, हेच कळले नाही. आमच्यात बायॅफ्रेन्ड - गर्लफ्रेन्डसारखे काहीही नव्हते. पण प्रेम होते.

ती स्वतंत्र कुटुंबातील होती. तिचे पापा बँकर होते. ती स्वत: मॉडेलिंग करत होती आणि मी बेकार होतो. मी चेंबूरला राहायचो आणि ती नेपियनसी रोडवर. मी तिला भेटायला बसने जायचो. पण ती मला टॅक्सी घ्यायला सांगायची. माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितल्यावर, जस्ट कम ना... आय विल मॅनेज... हे तिचे उत्तर ठरलेले असायचे.

लग्नानंतर मी किचनमध्ये जाणार नाही आणि जेवण बनवणार नाही, हे लग्नाआधीच सुनीताने स्पष्ट केले होते. त्यामुळे हिच्यासोबत लग्न करायचे तर मला काहीतरी बनावे लागेल, हे मला समजून चुकले होते. मी त्याकाळात प्रचंड स्ट्रगल केले. अर्थात सुनीताकडून माझ्यावर कधीच कुठला दबाव नव्हता.

‘मेरी जंग’नंतर आता मी सुनीतासोबत लग्न करू शकतो, असे मला वाटले. आता मी घर घेऊ शकत होतो, नोकर ठेऊ शकत होतो. मी सुनीताला फोन केला आणि उद्या आपण लग्न करतोय, असे तिला सांगितले. दुसऱ्याच दिवशी केवळ 10 लोकांच्या साक्षीने आम्ही लग्न केले. लग्नानंतर तीन दिवसांनी मी शूटवर निघून गेलो आणि सुनीता एकटी हनीमूनसाठी गेली. ती मला खूप चांगल्याप्रकारे ओळखते. ती एक परफेक्ट आईच नाही तर परफेक्ट पत्नी सुद्धा आहे. 

टॅग्स :अनिल कपूर