Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेकाच्या 'बॉर्डर २' विषयी सुनील शेट्टींना वाटतेय भीती, स्पष्टच म्हणाले- "धुरंधर सिनेमानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:14 IST

सनी देओलची प्रमुख भूमिका असलेला 'बॉर्डर २' सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात अभिनेता सुनील शेट्टीचा लेक अहान शेट्टीही झळकत आहे. सुनीलने लेकाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत

९० च्या दशकातील गाजलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल अर्थात 'बॉर्डर २' आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. आपल्या मुलाच्या या मोठ्या प्रोजेक्टबद्दल बोलताना अभिनेता सुनील शेट्टीने आपली भावना व्यक्त केली असून, तो एकाच वेळी आनंदी आणि काहीसा घाबरलेला देखील आहे. काय म्हणाला सुनील शेट्टी? जाणून घ्या

ANI ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीने सांगितले की, 'बॉर्डर' या ब्रँडशी त्याचे भावनिक नाते आहे. १९९७ मध्ये त्याने या चित्रपटात 'भैरव सिंह'ची अजरामर भूमिका साकारली होती. आता २९ वर्षांनंतर त्याचा मुलगा अहान याच फ्रँचायझीचा भाग बनला आहे, ही त्याच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. सुनील म्हणाला, "अहानला एवढ्या मोठ्या चित्रपटात संधी मिळाली, याचा मला मनापासून आनंद आहे. जे.पी. दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाने अहानवर जो विश्वास दाखवला, त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे."

सुनील शेट्टी पुढे म्हणाला, ''जर सर्व काही नीट झालं, तर हा सिनेमा अहानच्या फिल्मी करिअरसाठी खूप फायदेशीर ठरेल यात शंका नाही. तुम्ही जे काम करता त्यावर तुम्ही प्रेम केलं पाहिजे. यशाच्या दृष्टीने विचार केला तर आम्ही सुरक्षित आहेत. कारण बॉर्डर २ हा एक चांगला सिनेमा आहे. धुरंधरनंतर हा सिनेमा देशभक्तीचा डोस आणि बॉलिवूड सिनेमाला एक नवी उभारी देण्याचं काम करेल. त्यामुळे मी आनंदी आहेच पण थोडी भीतीही वाटतेय.''

अहान शेट्टी 'बॉर्डर २' मध्ये एका नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार असणार आहे. सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यासारख्या तगड्या स्टारकास्टमध्ये अहान आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनील शेट्टीने आपल्या चाहत्यांना 'बॉर्डर २' चित्रपट पाहण्याचे आणि अहानला आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Suniel Shetty fears for son Ahan's 'Border 2' success.

Web Summary : Suniel Shetty expresses mixed emotions about his son Ahan's 'Border 2'. Proud yet anxious, he hopes the film revives patriotism in Bollywood and boosts Ahan's career. He seeks blessings for Ahan.
टॅग्स :वरूण धवनसनी देओलसीमारेषादिलजीत दोसांझमोना सिंगअहान शेट्टीसुनील शेट्टी