Join us

अरिजीत सिंहच्या यशाचं कारण काय? सुनिधी चौहानने सांगितलं सत्य; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 17:42 IST

अरिजीत सिंहबद्दल काय म्हणाली सुनिधी चौहान?

आजकाल प्रत्येक हिंदी सिनेमात अरिजीत सिंहचा (Arijit Singh) आवाज असतोच. त्याने आपल्या आवाजाने चाहत्यांना वेडच लावलं आहे. अरिजीतचं गाणं हिटच होणार असाच विश्वास मेकर्सलाही असतो. एका दशकापासून अरिजीत त्याच्या आवाजाची जादू पसरवत आहे. अरिजीतच्या या यशाचं कारण काय हे नुकतंच गायिका सुनिधी चौहानने सांगितलं.

राज शमनीच्या पॉडकास्टमध्ये बॉलिवूडची सुरेली सुनिधी चौहाननेअरिजीत सिंहच्या गाण्यांवर आणि करिअरवर भाष्य केलं. तिने अरिजीतच्या वेगळ्या व्ह्यूची स्तुती केली. म्यूझिक फेस्टिव्हलला तो हजारो चाहत्यांनी घेरलेला असतो तेव्हा त्याला पाहून असं वाटतं की तो घरात आराम करत आहे. तो गायनात अक्षरश: बुडालेला असतो. तो आपल्या परफॉर्मन्सवर लक्षकेंद्रित करतो. ती म्हणाली, "अरिजीत संगीताचा असा विद्यार्थी आहे जो सतत शिकत असतो. त्याला माहितच नाहीए की तो अरिजीत सिंह आहे. तो स्वत:वर इतकं प्रेम करत नाही. अरिजीत खूपच विनम्र आहे. त्याची हीच विनम्रता त्याच्या कलेत आणि दुसऱ्यांच्यासोबतच्या वागण्यात दिसून येते."ती पुढे म्हणाली, "त्याच्यात एक गुण आहे की तो कोणतंही जॉनर आपलंसं करुन घेऊ शकतो. आपला आवाज न बदलता तो असं करतो. खूप कमी लोकांना हे जमतं. त्याचे जगभरात चाहते आहेत पम याचा त्याला थोडाही गर्व नाही. तो जसा आहे तसाच राहतो ही खूप चांगली "

टॅग्स :सुनिधी चौहानअरिजीत सिंहबॉलिवूडसंगीत