Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुमीत राघवनच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण, त्याची पत्नी देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 15:20 IST

सुमीत राघवनची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. आज त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे.

'महाभारत', 'तू तू मैं मैं', 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या मालिकांमध्ये सुमीत राघवनने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्याने मराठी, हिंदी चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमात विविध भूमिका साकारल्या आहेत. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटात तो ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिकेत झळकला होता. या भूमिकेला प्रेक्षकांची दाद मिळाली होती. सुमीत राघवनची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. आज त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याने सोशल मीडियावर पत्नी आणि  फॅमिली फोटो शेअर करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुमीत राघवनने फॅमिली आणि पत्नीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, ८/०६/१९९६- ८/०६/२०२१... २५ वर्षे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता आमच्या मुलांसोबत सिल्व्हर वेडिंग करणार आहोत. सर्वांनी मिळून या आलेल्या संकटावर मात करूया.

सिने इंडस्ट्रीमध्ये अनेक जोड्या हा नेहमीच चर्चेत असतात. मेड फॉर इच अदर असलेल्या अशा अनेक जोड्यांपैकी सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांची जोडी देखील आहे. खरे तर या दोघांनी एकत्र खूप कमी काम केले आहे. मात्र सेलिब्रेटी कपल म्हणून ही दोघं नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात.

ज्वालामुखी या नाटकाच्या निमित्ताने चिन्मयी आणि सुमितची भेट झाली होती. कोण प्रपोज करणार याची वाट बघण्यातच पहिली काही वर्षे अशीच नुसती फिरण्यात गेली आणि शेवटी कुणीच कुणाला प्रपोज न करता काय कळायचे त्या दोघांनाही आपण एकमेकांच्या प्रेमात असल्याचे समजले होते.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सुमीत राघवन सध्या वागळे की दुनिया या मालिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. या मालिकेला प्रेक्षकांची खूप चांगली दाद मिळते आहे. तर चिन्मयी सध्या जीव झाला येडा पिसा या मालिकेत आत्याबाई या आमदारीण बाईची भूमिका निभावताना दिसत आहे.   

टॅग्स :सुमीत राघवनचिन्मयी सुमीत