Join us

'सुख म्हणजे नक्की...' फेम गिरिजा प्रभू देतेय फिटनेसचे धडे, व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:22 IST

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. गिरिजाने नुकतंच व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

कलाकार आणि सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसकडे नेहमीच लक्ष देताना दिसतात. स्वत:च्या फिटनेसबरोबरच ते चाहत्यांनाही फिटनेसचं महत्त्व पटवून देत असतात. अनेकदा सेलिब्रिटी व्यायाम करतानाचे जीममधील व्हिडिओही शेअर करताना दिसतात. आता मराठी अभिनेत्रीही चाहत्यांना फिटनेसचे धडे देत आहे. 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. फिटनेससाठी गिरिजा नियमित व्यायाम करते. गिरिजाने नुकतंच व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत गिरिजा योगा मॅटवर व्यायाम करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गिरिजाच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहते तिचं कौतुक करत आहेत. 

गिरिजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने गिरिजाला लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तिने गौरी ही भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. गिरिजाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. 

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाह