Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुगंधा मिश्राला लता मंगेशकर यांच्यासोबत करायचे होते कनेक्शन, म्हणून भोसले अडनावाचे केलं सिलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 16:58 IST

सुगंधा आणि संकेत २६ एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले. त्यांचा लग्नसोहळा जालंधर येथील कबाना क्लबमध्ये पार पडला होता.

कॉमेडियन सुगंधा म‍िश्रा गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. कॉमेडीयन संकेत भोसलेसह ती लग्नबंधनात अडकत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. अभिनेत्री सुगंधा मिश्रा केवळ कॉमेडीच नाही तर मिमिक्रीही करते.ती कपिल शर्माच्या शोमध्येही तिने आपल्या कॉमेडीने रसिकांना खळखळून हसवले आहे. सुगंधाप्रमाणे तिचा पती  संकेत भोसले देखील उत्तम कॉमेडीयन आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये तो देखील अनेक सेलिब्रिटींची मिमिक्री करताना दिसला होता. त्याने केलेली अभिनेता संजय दत्तची मिमिक्री चाहत्यांना खूप आवडते.

 

लग्नानंतर हे नवदाम्पत्य वेगवेगळे व्हिडीओ करत लग्नानंतरचे आयुष्य विनोदी पद्धतीने मांडत सोशल मीडियावर चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. आत्तापर्यत असे बरेच व्हिडीओंना चाहत्यांची पसंती मिळवली आहे. आता पुन्हा एकदा सुगंधा मिश्राचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ खूपच खास आहे. कारण लग्नाच्या दिवशीच सुगंधाने हा व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओत  गाणं कोकीळा लता मंगेशकर यांची मिमिक्री करत असल्याचे दिसतं आहे.

लता दीदींच्या स्टाईलमध्ये गाणं गात बोलते, “तसे तर मी पूर्ण प्रयत्न केले होते की, दीदींच्या कुटुंबाचा एक भाग बनू, म्हणून मी विचार केला की माझं आडनाव भोसले करुन घेऊ. कारण माझी लहान बहिण सुद्धा भोसले आहे .तर या प्रकारे सुगंधा दीदींच्या अजुन जवळचे नाते निर्माण झाले. सुगंधा मिश्रा भोसले”, असे सुगंधा त्या व्हिडीओत बोलत आहे. सुगंधाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळत असून प्रचंड व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :सुगंधा मिश्रालता मंगेशकर