Join us
Daily Top 2Weekly Top 5

खूबसूरत! स्त्री २ चं गाणं रिलीज; श्रद्धा कपूरचं देखणं सौंदर्य अन् वरुण धवनचा कॅमिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 17:42 IST

'स्त्री 2' मध्ये वरुण धवनही भेडियाच्या रुपात कॅमिओ करणार आहे.

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार रावच्या आगामी 'स्त्री 2' (Stree 2) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलर आल्यापासूनच उत्सुकता ताणली गेली आहे. 2018 साली आलेला 'स्त्री' हा हॉरर कॉमेडी सिनेमा सुपरहिट झाला होता. मॅडॉक फिल्म्सने यानंतर आणखी काही हॉरर कॉमेडी सिनेमे आणले. वरुण धवनचा (Varun Dhawan) 'भेडिया' हा त्यापैकीच एक. आता आगामी 'स्त्री 2' मध्ये वरुण धवनही भेडियाच्या रुपात कॅमिओ करणार आहे. श्रद्धा आणि वरुणचं 'खूबसूरत' हे रोमँटिक गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.

'खूबसूरत' गाण्यामध्ये श्रद्धा लाल साडीत कमालीची सुंदर दिसत आहे. तर वरुण धवन 'भेडिया'च्या रुपात आला आहे. 'स्त्री'चा चाहता राजकुमार राव म्हणजे विकीही गाण्यात तिच्यासोबत रोमान्स करताना दिसतोय. तर दुसरीकडे भेडियाही स्त्री वर फिदा झाला आहे. त्यामुळे भेडिया आणि विकी यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. खूबसूरत गाणं 'स्त्री'च्या अप्रतिम लाजवाब सौंदर्यावर आहे ज्यात श्रद्धा खूपच खुलून दिसत आहे.

स्त्री आणि भेडियाचं हे कोलॅबोरेशन पाहून चाहते आणखी आतुर झाले आहेत. 15 ऑगस्टला 'स्त्री 2' प्रदर्शित होतोय. यामध्ये राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांचीही भूमिका आहे. शिवाय तमन्ना भाटियाचाही कॅमिओ पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे वरुण धवन आण िश्रद्धा कपूरने 'एबीसीडी' सिनेमात एकत्र काम केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांची केमिस्ट्री स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूरवरूण धवनराजकुमार रावबॉलिवूड