Join us

'स्त्री २'च्या दिग्दर्शकाने कान पकडून मागितली श्रद्धा कपूरची माफी, 'त्या' वक्तव्यामुळे झालेला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 10:37 IST

'स्त्री २' च्या दिग्दर्शकाने सर्वांसमोर श्रद्धा कपूरची माफी मागितली आहे. काय आहे यामागचं कारण (stree 2, shraddha kapoor)

२०२४ ला रिलीज झालेला 'स्त्री २' (stree 2) सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला. अमर कौशिक (amar kaushika) यांनी 'स्त्री २' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. श्रद्धा कपूरने (shraddha  kapoor) सिनेमात प्रमुख भूमिका साकारली. सहजसुंदर कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे 'स्त्री २' सर्वांना आवडला. 'स्त्री २'चा दिग्दर्शक अमर कौशिक आणि श्रद्धा कपूर काल मॅडॉक फिल्मने मुंबईत जो इव्हेंट आयोजित केला होता, तिथे एकत्र आले. त्यावेळी अमर कौशिकने श्रद्धाची कान पकडून माफी मागितली. काय आहे यामागचं कारण, जाणून घ्या

म्हणून अमरने श्रद्धाची मागितली माफी

झालं असं की, दिग्दर्शक अमर कौशिक आणि श्रद्धा कपूर मॅडॉक फिल्मच्या इव्हेंटला एकत्र आले. त्यावेळी श्रद्धा कपूरने अमरची चांगलीच फिरकी घेतली. "हा सध्या खूप जोक मारतोय",  असं म्हणत श्रद्धाने मस्तीखोर अंदाजात अमरला मारलं. अमरने श्रद्धासमोरच कान पकडून तिची माफी मागितली. दोघांमधील ही अफलातून केमिस्ट्री पाहून सर्वांनाच हसू आलं. एकूणच सर्व पापाराझींसमोर श्रद्धाने अमरची चांगलीच फिरकी घेतली. पण अमरने श्रद्धाची माफी का मागितली, यामागे एक कारण आहे. ज्यामुळे अमरला गेल्या काही दिवसांपासून ट्रोल करण्यात येतंय.

काही दिवसांपूर्वी अमरने गेम चेंजर्स नावाच्या एका यूट्युब चॅनलला मुलाखत दिली होती. त्यात अमरने 'स्त्री' सिनेमासाठी श्रद्धाची निवड कशी करण्यात आली, याचा खुलासा केला.  अमर म्हणाला होता की, "मी आणि श्रद्धा एकदा विमानात प्रवास करत होतो. त्यावेळी श्रद्धा ज्या प्रकारे हसते तेव्हा ती अगदी स्त्री सारखी दिसते. श्रद्धा हसताना चेटकिणीसारखी दिसते". या वक्तव्यामुळे अमरला श्रद्धाच्या चाहत्यांनी चांगलंच ट्रोल केलं. याच वक्तव्यावरुन श्रद्धाने अमरची फिरकी घेतली. परिणामी अमरने कालच्या इव्हेंटमध्ये सर्वांसमोर श्रद्धाची माफी मागितली. 

टॅग्स :श्रद्धा कपूरबॉलिवूड