Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘नाटू नाटू’ने रचला इतिहास, थेट ऑस्करमध्ये मारली एंट्री; ओरिजनल सॉंग कॅटेगिरीत नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 19:57 IST

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. 95 व्या ऑस्कर पुरस्कार 2023 साठी नामांकने जाहीर झाली आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. 95 व्या ऑस्कर पुरस्कार 2023 साठी नामांकने जाहीर झाली आहेत. यावेळी एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने त्यात आपले स्थान निर्माण केले आहे. गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे. 'नाटू नाटू' या गाण्याने लेडी गागा आणि री-री यांच्या गाण्यांना मागे टाकल्याचे बोलले जात आहे.

बेव्हरली हिल्स, कॅलिफोर्निया येथे आयोजित ऑस्कर पुरस्कार 2023 नामांकन करण्यात आले आहे. त्याचे नामांकन होस्ट रिझ अहमद आणि अभिनेत्री अॅलिसन विल्यम्स यांनी केले होते. 

याशिवाय शौनक सेनची डॉक्युमेंटरी फीचर फिल्म ऑल दॅट ब्रीदस देखील ऑस्कर अवॉर्ड्स 2023 साठी नामांकित झाली आहे. गुनीत मुंगी दिग्दर्शित 'द एलिफंट व्हिस्परर्स' या लघुपटासाठी नामांकन मिळाले आहे. देशातील तीन चित्रपट ऑस्कर जिंकण्याच्या शर्यतीत उतरले ही आज भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. भारतातील अधिकृत एंट्री, 'चेल्लो शो' (द लास्ट फिल्म शो) शीर्ष 15 मध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. पण, तिचा कोणत्याही क्षेणीत समावेश झाला नाही.

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने गोल्डन ग्लोब 2023 पुरस्कार जिंकला. याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीचा पुरस्कार मिळाला आहे. भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे. चाहत्यांनी ट्विटरवर टीमचे अभिनंदन केले. RRR च्या टीमने ट्विटरवर शेअर करुन माहिती दिली आहे. ऑस्कर पुरस्कार 2023 मधील नामांकनाबद्दल संपूर्ण टीम खूप आनंदी आहे. या चित्रपटाने एक इतिहास रचल्याचे बोलले जात आहे. प्रथम गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 पुरस्कार आणि आता ऑस्कर पुरस्कार 2023 ने नामांकनात आपले स्थान निर्माण केले आहे.

 

टॅग्स :ऑस्करबॉलिवूड