Join us

धावत आली, कॉलर पकडली अन्...; थिएटरमध्येच अभिनेत्याला महिलेची मारहाण, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 19:54 IST

चाहत्यांना सरप्राइज द्यायला आलेल्या एका तेलुगु अभिनेत्याला प्रेक्षक महिलेकडून मार खावा लागला आहे. सिनेमागृहातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

अनेकदा सेलिब्रिटी सिनेमागृहात प्रेक्षकांना सरप्राइज देण्यासाठी पोहोचतात. मात्र चाहत्यांना सिनेमा चालू असताना असं सरप्राइज देणं एका दाक्षिणात्य अभिनेत्याला मात्र महागात पडलं आहे. चाहत्यांना सरप्राइज द्यायला आलेल्या एका तेलुगु अभिनेत्याला प्रेक्षक महिलेकडून मार खावा लागला आहे. सिनेमागृहातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सिनेमागृहातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सिनेमात सुरू असल्याचं दिसत आहे. त्यानंतर अचानक सिनेमातील कलाकार चाहत्यांना सरप्राइज द्यायला थिएटरमध्ये येतात. तेवढ्यात प्रेक्षकांमधील एक महिला कलाकारांजवळ धावत येत असल्याचं दिसत आहे. अभिनेत्याची कॉलर पकडून त्याला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. हैदराबादमधील एका थिएटरमध्ये हा प्रकार घडला आहे. तेलुगु अभिनेता रामास्वामी यांच्याबरोबर ही घटना घडली आहे. 

या सिनेमात रामास्वामी यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. ही भूमिका महिलेला आवडली नाही. त्यामुळे रागाच्या भरात महिलेने रामास्वामींबरोबर हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. महिलेने अभिनेत्याला मारहाण केल्यानंतर काही जण तिला अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय हा एक सिनेमा असल्याचं सांगत तिला इतर कलाकारही समजावताना दिसत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी