Join us
Daily Top 2Weekly Top 5

लगीनघटिका समीप आली! जयपूर विमानतळावर पोहोचले विजय-रश्मिका, फॉर्मल लूकमध्ये ट्विनींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 12:56 IST

लग्नाच्या आधीपासूनच ट्विनिंगला सुरुवात, विजय रश्मिकाचा विमानतळावर फॉर्मल लूक

साउथमधील रोमँटिक आणि चाहत्यांचं आवडतं कपल विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लवकरच लग्न करणार आहेत. चाहत्यांनीच दिलेला 'विरोश' असा हॅशटॅग त्यांनी ऑफिशियल वापरला आहे. चाहत्यांचं प्रेम पाहता त्यांनी एक नोट लिहून स्वत:च हा हॅशटॅग व्हायरल केला आहे. सोबतच पहिल्यांदाच लग्नाची बातमीही कन्फर्म केली आहे. २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमधील पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. यासाठी दोघंही नुकतेच उदयपूर विमानतळावर पोहोचले आहेत. लवकरच लग्नबंधनात अडकणाऱ्या या क्युट कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाल आहे. रश्मिका लाइट शर्ट, पँट आणि ब्लेझर अशा फॉर्मल आउटफिटमध्ये स्टायलिश दिसत आहे. तिच्यासोबत तिची मोठी टीमही आहे. विमानतळाच्या बाहेर येताच पापाराझींना बघून तिने हसत नमस्कार केला आणि लगेच कारमध्ये बसून ती रवाना झाली. 

तर काही वेळाने विजय देवरकोंडाही विमानतळाबाहेर आला. यावेळी तोही एकदम फॉर्मल लूकमध्ये दिसत होता. लग्नाआधी दोघंही आतापासूनच ट्विनिंग करताना दिसत आहेत. तसंच विजयची झुपकेदार मिशी आणि वेगळ्या बिअर्ड लूकने लक्ष वेधलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा येत्या २६ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. रश्मिका-विजयचं लग्न हे एक प्रायव्हेट सेरेमनी असणार आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडणार आहे. त्यांच्या लग्नात कोणत्याही सेलिब्रिटींना आमंत्रित केलेलं नाही. तर रश्मिका-विजयच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी नो फोन पॉलिसी असेल. त्यांनतर ४ मार्चला हैदराबादमध्ये रिसेप्शन असणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vijay and Rashmika arrive in Jaipur, wedding bells ringing soon!

Web Summary : Vijay Deverakonda and Rashmika Mandanna are reportedly getting married on February 26 in Udaipur. The couple was spotted at the Jaipur airport in formal attire. The wedding will be a private affair with close family and friends. Reception to be held in Hyderabad on March 4.
टॅग्स :विजय देवरकोंडारश्मिका मंदानाTollywoodबॉलिवूडशुभविवाह