Join us
Daily Top 2Weekly Top 5

बायकोवर एवढं प्रेम! प्रत्येक वाढदिवसाला अभिनेत्रीचा नवरा देतो महागडी कार, आता बर्थडेला दिली १० कोटींची गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:21 IST

एका अभिनेत्रीलाही तिचा पती प्रत्येक वाढदिवशी महागडी गाडी गिफ्ट म्हणून देतो. यावर्षीही अभिनेत्रीच्या पतीने ही परंपरा कायम ठेवली. अभिनेत्रीला या वाढदिवशी तिच्या पतीने तब्बल कोट्यवधी रुपयांची महागडी कार गिफ्ट केली आहे.

प्रत्येक नवरा पत्नीच्या वाढदिवशी तिला हटके गिफ्ट देऊन खूश करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. सेलिब्रिटीही त्यांच्या पत्नीला महागडं गिफ्ट देतात. एका अभिनेत्रीलाही तिचा पती प्रत्येक वाढदिवशी महागडी गाडी गिफ्ट म्हणून देतो. यावर्षीही अभिनेत्रीच्या पतीने ही परंपरा कायम ठेवली. अभिनेत्रीला या वाढदिवशी तिच्या पतीने तब्बल कोट्यवधी रुपयांची महागडी कार गिफ्ट केली आहे. साऊथ ब्युटी नयनताराचा नुकताच वाढिदवस झाला. नयनताराने मंगळवारी(१८ नोव्हेंबर) तिचा ४१वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवशी पती विघ्नेश शिवनने तिला खास गिफ्ट दिलं आहे. 

विघ्नेशने नयनताराला ४१व्या वाढदिवशी महागडी कार गिफ्ट केली आहे. विघ्नेशने नयनताराला रोल्स रॉयस या लक्झरीयस कंपनीची आलिशान गाडी बर्थडे गिफ्ट म्हणून दिली आहे. जिची किंमत तब्बल १० कोटी इतकी आहे. नयनताराच्या वाढदिवशी गाडीचा फोटो शेअर करत विघ्नेशने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये नयनतारा, विघ्नेश आणि त्यांची दोन मुलं दिसत आहेत. "मी तुझ्यावर खरं आणि वेड्यासारखं प्रेम करतो. देव त्याची कृपा आपल्यावर सदा करत राहो. तुला खूप सारं प्रेम", असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 

नयनतारा आणि विघ्नेशने २०२२ साली पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. त्याआधी काही वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. सरोगसीच्या मदतीने ते जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. विघ्नेश नयनताराच्या प्रत्येक बर्थडेला तिला गाडी गिफ्ट करतो. गेल्या वर्षी त्याने ५ कोटींची मर्सिडीज गिफ्ट केली होती. तर त्याच्या आदल्या वर्षी म्हणजेच लग्नानंतरच्या नयनताराच्या पहिल्या वाढदिवसाला ३ कोटींची मर्सिडीज नयनताराला गिफ्ट म्हणून दिली होती.  

English
हिंदी सारांश
Web Title : Nayanthara's husband gifts ₹10 crore car on her birthday!

Web Summary : South Indian actress Nayanthara received a Rolls Royce worth ₹10 crore from her husband, Vignesh Shivan, for her 41st birthday. He has gifted her luxury cars every birthday, continuing the tradition. The couple married in 2022 and have twins via surrogacy.
टॅग्स :नयनताराTollywood