Join us
Daily Top 2Weekly Top 5

थलपती विजयसोबत अफेअरच्या चर्चा, त्रिशा कृष्णनचा निर्मात्यावर संताप; दिले चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 10:04 IST

त्रिशा आणि प्रसिद्ध निर्मात्यामध्ये नेमका काय झाला वाद?

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णनने नुकतेच एका रिसेप्शन पार्टीत एकत्र हजेरी लावली. काही दिवसांपूर्वीच विजयच्या पत्नीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. विजयचे विवाहबाह्य संबंध आहे असा तिने आरोपही केला. यानंतर दोनच दिवसात विजय आणि त्रिशा एकत्र दिसले. त्यांना एकत्र पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली. त्यातच निर्माते आर. पार्थिबन यांनी एका अवॉर्ड सोहळ्यात त्रिशाचा फोटो पाहून वादग्रस्त भाष्य केलं. त्यावर आता त्रिशाने ट्वीट करत सडेतोड उत्तर दिलं आहे.

गलाटा अवॉर्ड्स कार्यक्रमात निर्माते आर. पार्थिबन यांना काही अभिनेत्रींचे फोटो दाखवले गेले ज्यांसोबत त्यांनी काम केलं आहे. यामध्ये त्रिशाचाही फोटो होता. तो फोटो पाहून पार्थिबन म्हणाले,'या कुंदवाईने काही दिवस घरातच राहणे चांगले ठरेल. ती बाहेर आली तर बऱ्याच समस्या निर्माण होत आहेत.'

पार्थिबन यांनी केलेल्या या टिप्पणीनंतर तृषा कृष्णनने ८ मार्च रोजी 'एक्स'वर(ट्विटर) पार्थिबन यांना नाव न घेता चांगलेच फटकारले आहे. तृषाने लिहिले की, "कार्यक्रमाच्या आयोजकांनी मला सांगितले की, एका सहाय्यकाच्या विनंतीवरून माझे नाव आणि फोटो शेवटच्या क्षणी समाविष्ट करण्यात आले होते." तिने पुढे संताप व्यक्त करताना म्हटले की, "हातात माईक असल्यामुळे तुम्ही बोलताय ते योग्यच आहे असं नाही तर ती फक्त मूर्खपणा मोठ्या आवाजात मांडते. माहिती नसताना केलेले खालच्या पातळीचे भाष्य समोरच्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अधिक सांगून जाते."

या संपूर्ण वादावर थलपती विजयने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला की, घटस्फोटाचे प्रकरण हे त्याचे वैयक्तिक आयुष्य आहे आणि तो स्वतः ते हाताळण्यास सक्षम आहे. लोकांनी यात पडण्याची गरज नसल्याचे त्याने स्पष्ट केले. दरम्यान, संगीताने दाखल केलेल्या नवीन याचिकेवर आता २० एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणाने तमिळ चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ माजली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trisha Krishnan slams producer over affair rumors with Thalapathy Vijay.

Web Summary : Trisha Krishnan, facing affair rumors with Thalapathy Vijay after his wife filed for divorce, rebuked producer R. Parthiban's inappropriate comments at an awards show. Vijay addressed the divorce as personal.
टॅग्स :सेलिब्रिटीTollywoodसोशल मीडिया