Join us
Daily Top 2Weekly Top 5

"प्रेम म्हणजे सर्वकाही नाही...", थलपति विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान त्रिशा कृष्णनची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:22 IST

प्रेमाबद्दल काय म्हणाली त्रिशा कृष्णन?

दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत  आहे. साउथ सुपरस्टार थलपति विजयच्या पत्तनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे थलपति विजय एका रिसेप्शनला त्रिशा कृष्णनसोबत आला. यामुळे दोघांमधील अफेअरच्या चर्चांना पुन्हा जोर आला. दोघांवर चांगलीच टीकाही झाली. त्रिशा आणि थलपति विजयच्या नात्याची चर्चा बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे. दरम्यान आता त्रिदशाने प्रेमाबद्दल एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

त्रिशा कृष्णनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यात असे लिहिले आहे की, 'प्रेम हेच सर्वकाही नाही तरी प्रेमाशिवाय कशालाच अर्थ नाही.' यासोबत तिने एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यात म्हटले आहे की, 'मी आता आयुष्याच्या त्या टप्प्यावर आहे जिथे तुम्ही मला म्हणाल की हत्ती उडू शकतात तर मी कोणताही वाद न घालता मान्य करेन. याचा अर्थ हा नाही की मला हे पटलंय पण तुम्ही काय विचार करता याच्याशी मला घेणंदेणं नाही."

यापुढे व्हिडीओत ती म्हणते, "मी एक महत्वाची गोष्ट शिकले. एखाद्याला स्पष्टीकरण देण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले. आणि तुमच्या एनर्जीचा वापर करण्याचा अधिकार प्रत्येकाला मिळू नये. काही वाद हे केवळ गैरसमज नसतात, तर तुमची मानसिक शक्ती खर्च करण्याचे ते एक साधन असते. प्रगती अशीच दिसते - कोणत्याही आवाजाशिवाय, शांतपणे." 

त्रिशाने या पोस्ट शेअर करत त्यावर 'FACT' म्हणजेच 'तथ्य' असे लिहिले आहे. त्रिशा साउथमधील सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. थलपति विजयसोबत त्रिशाने 'घिल्ली',  'थिरुपाचि', 'आथी', 'कुरुवी' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. मधल्या काळात दोघांनी १५ वर्ष एकत्र काम केलं नव्हतं. तर २०२३ मध्ये ते 'लियो' सिनेमात दिसले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trisha Krishnan's cryptic post amid affair rumors with Thalapathy Vijay.

Web Summary : Trisha Krishnan's cryptic post about love surfaces amidst affair rumors with Thalapathy Vijay. She emphasizes prioritizing mental peace and disregarding others' opinions after Vijay's divorce rumors sparked relationship speculation.
टॅग्स :सेलिब्रिटीसोशल मीडियाTollywood