Join us
Daily Top 2Weekly Top 5

Toxic Controversy: यशसोबत बोल्ड सीन दिल्याने ट्रोल झाली; आता वैतागून अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:01 IST

यशसोबत 'टॉक्सिक' सिनेमात काम केल्याने अभिनेत्री चांगलीच ट्रोल झाली. अखेर ट्रोलिंगला वैतागून अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या आगामी 'टॉक्सिक' (Toxic) या चित्रपटामुळे सध्या सिनेसृष्टीत मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी असलेली अभिनेत्री बीट्रिज टॉफेनबॅच (Beatriz Taufenbach) हिने 'टॉक्सिक'च्या टीझरमध्ये यशसोबत बोल्ड सीन दिला. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली. पण आता अभिनेत्री बीट्रिजने ट्रोलिंगला कंटाळून मोठा निर्णय घेतला आहे.

काय आहे नेमका वाद?

'टॉक्सिक' चित्रपटाच्या कास्टिंगवरून गेल्या काही दिवसांपासून तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, अभिनेत्री बीट्रिज टॉफेनबॅच हिने या चित्रपटात आपली वर्णी लागल्याचे संकेत देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. चित्रपटाच्या टीझरमध्येच बीट्रिजने बोल्ड सीन दिल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. त्यामुळे बीट्रिजला अनेकांनी ट्रोल केलं. इतकंच नव्हे तिच्यावर वैयक्तिक टीकाही करण्यात आली. त्यामुळेच ट्रोलिंग आणि टीकेला कंटाळून बीट्रिजने आपले अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे.

चित्रपटाबद्दल गुप्तता दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्या 'टॉक्सिक' चित्रपटाबद्दल निर्मात्यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. यश व्यतिरिक्त या चित्रपटात नक्की कोणकोणते कलाकार असणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु चित्रपटाचा टीझर आल्यानंतर बोल्ड सीनमुळे बीट्रिजबद्दल लोकांनी अत्यंत नकारात्मक आणि खालच्या भाषेत कमेंट केल्या. त्यामुळेच बीट्रिजने हा निर्णय घेतला.

'KGF' च्या यशानंतर अभिनेता यशच्या या नव्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ड्रग्ज माफिया आणि गँगस्टर बॅकड्रॉपवर आधारित असल्याची चर्चा आहे.१९ मार्च २०२६ ला 'टॉक्सिक' रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे 'टॉक्सिक' आणि 'धुरंधर पार्ट २' या दोन बिग बजेट सिनेमांची बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर बघायला मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Toxic Controversy: Actress trolled for bold scenes with Yash, quits Instagram.

Web Summary : Beatriz Taufenbach, facing severe trolling for her bold scenes with Yash in 'Toxic', deactivated her Instagram account due to the backlash and personal attacks following the teaser release. The film's secrecy adds to the controversy.
टॅग्स :यशयशकेजीएफबॉलिवूडTollywood