Join us

वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता चढला बोहल्यावर, आर्किटेक्ट गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:55 IST

प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या ४१ व्या वर्षी लाँग टाईम गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ. गर्लफ्रेंड आहे पेशाने आर्किटेक्ट

मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्याने वयाच्या ४१ व्या वर्षी गर्लफ्रेंडसोबत लग्न बांधली आहे. हा अभिनेता आहे अर्जुन चिदंबरम. प्रसिद्ध अभिनेता आणि नुकताच कमल हासनच्या 'ठग लाईफ'मध्ये झळकलेला अभिनेता अर्जुन चिदंबरमने लाँग टाईम गर्लफ्रेंड जयश्री चंद्रशेखरण हिच्याशी नुकतंच लग्न केलं आहे. हे लग्न अगदी खासगी पद्धतीने चेन्नईत पार पडलं. कुटुंबातील काही जवळचे व्यक्ती आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पारंपरिक रीतीरिवाजानुसार हा विवाहसोहळा पार पडला.

अर्जुनने केलं लग्न

अर्जुन आणि जयश्री अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये होते. या दोघांचे रोमँटिक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी रिलेशनशीपचा जाहीर खुलासा केला. या नात्याला पुढे घेऊन या दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. अर्जुनने आपल्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जोडपं खूप आनंदी आणि समाधानी दिसत आहे.

शेअर केलेल्या फोटोसोबत अर्जुनने एक हृदयस्पर्शी पोस्टही लिहिली आहे. त्यामध्ये त्याने आपल्या आयुष्यातील जयश्रीचे महत्त्व सर्वांना सांगितलं आहे. जयश्री ही पेशाने आर्किटेक्ट असून अर्जुन हा लोकप्रिय अभिनेता आहे. साउथ इंडस्ट्रीत विविध भूमिका अर्जुन करताना दिसतो. चाहत्यांनी अर्जुन आणि जयश्रीच्या या नव्या प्रवासासाठी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेक कलाकारांनीही या नवविवाहित जोडप्याला पुढील आयुष्यासाठी आणि सुखद वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :लग्नबॉलिवूडTollywoodटिव्ही कलाकार