Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणरणतं वाळवंट, गिधाडं अन् तो... 'द गोट लाईफ'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:55 IST

पृथ्वीराज सुकुमारनच्या आगामी 'द गोट लाईफ' सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज झालाय

पृथ्वीराज सुकुमारनचा आगामी चित्रपट 'द गोट लाइफ' सिनेमा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे.  आज 9 मार्च रोजी 'द गोट लाईफ'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज करण्यात आला.  हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे. सिनेमाचा ट्रेलर इतका भन्नाट आहे की अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. काय आहे ही सत्यकथा? आणि कसा आहे 'द गोट लाइफ'चा ट्रेलर जाणून घ्या.

'द गोट लाइफ' हा चित्रपट नजीब या माणसाच्या वास्तविक आयुष्यावर आधारीत आहे. चांगल्या आयुष्याच्या शोधात निघालेला नजीब पुढे कसा भरकटत जातो त्याची कहाणी 'द गोट लाइफ' चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ‘आदुजीविथम’ या कादंबरीवर आधारित आहे. मल्याळम साहित्यिक जगतातील सर्वात लोकप्रिय बेस्ट सेलरपैकी एक म्हणून ही कादंबरी मानली जाते.

‘आदुजीविथम’ कादंबरीचे विदेशी भाषांसह १२ वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. प्रख्यात लेखक बेन्यामीन यांनी या कादंबरीत नजीब या तरुणाच्या जीवनाची सत्यकथा मांडली आहे. हा तरुण 90 दशकाच्या सुरुवातीला केरळचा हिरवागार प्रदेश सोडून पुढे परदेशात नशीबाच्या शोधात स्थलांतरित झाला होता. 'द गोट लाइफ' सिनेमा २८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

टॅग्स :Tollywood