Join us
Daily Top 2Weekly Top 5

त्रिशा क्रिष्णनसोबत अफेअरच्या चर्चा असतानाच थलपति विजयचं मोठं विधान, थेट म्हणाला- "तुम्ही मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 09:16 IST

थलापति विजय हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चर्चेतील अभिनेता. थलपति विजय गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत अफेअरच्या चर्चांमुळे थलपति विजय चर्चेत आला होता.

थलापति विजय हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चर्चेतील अभिनेता. थलपति विजय गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत अफेअरच्या चर्चांमुळे थलपति विजय चर्चेत आला होता. याशिवाय थलपतिचा कारकीर्दीतील अखेरचा सिनेमा 'जन नायगन'चं प्रदर्शनही थांबवण्यात आलं आहे. या सर्व मुद्द्यांवर थलपति विजयने मौन सोडलं आहे. याशिवाय जे कोणी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ उठवत आहेत त्यांच्यावर त्याने थेट निशाणा साधला आहे.  

काल थलपति विजयची एक रॅली झाली. यात तो म्हणतो की, "ठीक आहे, आता पुढे माझ्याविषयी आणखी काय करू शकतो? चला, 'जन नायकन'चं प्रदर्शन रोखूया. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून कोणी रोखला, हे तुम्हाला माहीतच आहे. जेव्हा ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, तेव्हा विजयसाठी नवीन नियम बनवूया आणि SOP लागू करूया. त्याने बाहेर येऊन लोकांना भेटू नये, असे निर्बंध घालूया."

याच रॅलीत विजय शेवटी म्हणाला. "तुम्हाला माहित आहे मी कशाबद्दल बोलतोय; पण त्यांचे ते प्रयत्न देखील यशस्वी झाले नाही. तुम्ही मला कितीही संकटात टाकले किंवा कितीही त्रास दिलात, तरी तुम्ही मला माझ्या लोकांपासून कधीही वेगळे करू शकत नाही.", अशाप्रकारे विजयने त्याची रोखठोक भूमिका मांडली. विजयने नाव घेतलं नसलं तरीही वैयक्तिक आयुष्यात त्याच्यावर जी चिखलफेक केली जातेय त्यावर त्याने भाष्य केलंय.विजय-त्रिशाचं अफेअरविजयचं रिअल लाईफमध्ये संगीता यांच्याशी लग्न झालं. त्या दोघांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली असून त्यांना दोन मुले आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून संगीता सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये विजयसोबत दिसत नसल्याने त्यांच्यात दुरावा असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच 'लिओ' चित्रपटातील त्याची सहकलाकार त्रिशा कृष्णनसोबत विजयचे नाव जोडले गेल्याने या वादात अधिक भर पडली. दोघे काही वेळेस जाहीरपणे काही खासगी कार्यक्रमांमध्ये एकत्रही दिसले.

English
हिंदी सारांश
Web Title : Thalapathy Vijay addresses affair rumors, defends against career sabotage attempts.

Web Summary : Thalapathy Vijay refuted affair rumors with Trisha Krishnan and addressed halted film releases. He asserted resilience against personal attacks, emphasizing his unwavering connection with his fans despite attempts to create distance. Vijay's personal life has faced scrutiny amid separation rumors from his wife.
टॅग्स :Tollywoodबॉलिवूडसेलिब्रिटी