तमिळनाडूच्या राजकारणात सध्या सुपरस्टार थलपती विजय आणि त्याच्या 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाची चर्चा आहे. केवळ दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाने निवडणुकीत १०८ जागांवर आघाडी मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. एकेकाळी फॅन असोसिएशनपासून सुरू झालेला हा प्रवास आज तमिळनाडूची सत्ता काबीज करण्यापर्यंत पोहोचला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर विजय आता तमिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून चर्चेत आला असून, सिनेमाप्रमाणेच राजकारणातही तो इतिहास रचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विजयच्या राजकीय यशासोबतच सध्या त्याच्या कौटुंबिक आयुष्यातील एक रंजक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. थलपती विजय चक्क आपल्याच आई-वडिलांच्या लग्नात हजर होता. विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर ख्रिश्चन होते, तर आई शोभा हिंदू होत्या. त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाला कधीही धर्माची बाधा आली नाही. विजय सहा वर्षांचा असताना, त्याच्या आईच्या इच्छेनुसार या दांपत्याने चर्चमध्ये दुसऱ्यांदा विवाह केला आणि या सोहळ्याला छोटा विजय स्वतः हजर होता. या अनोख्या विवाहाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.
विजयच्या आई-वडिलांच्या प्रेमविवाहात तमिळ चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते शिवाजी गणेशन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. चंद्रशेखर यांनी आपली प्रेमकहाणी शिवाजी गणेशन यांना सांगितली होती आणि त्यानंतर गणेशन यांच्या पत्नी कमला अम्माल यांनीच लग्नात शोभा यांना मंगळसूत्र दिले होते. चित्रपटसृष्टीच्या आशीर्वादाने हा विवाह पार पडला आणि १९७४ मध्ये थलपती विजयचा जन्म झाला. विजयच्या आयुष्यात त्याच्या लहान बहिणीच्या मृत्यूचा मोठा आघात झाला होता, ज्यामुळे तो काही काळ जगापासून अलिप्त झाला होता, मात्र वडिलांच्या चित्रपट क्षेत्रातील संबंधांमुळे त्याने बालकलाकार म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले आणि पुढे तो सुपरस्टार बनला.
वैयक्तिक आयुष्यात विजयनेही आपल्या पालकांप्रमाणेच संगीता या हिंदू मुलीशी विवाह केला, मात्र सध्या त्यांच्या २७ वर्षांच्या संसारात दुरावा आल्याच्या बातम्या आहेत. संगीताने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे वृत्त असून, विजयच्या वैयक्तिक आयुष्यातील या पडझडीच्या काळातच त्याच्या राजकीय कारकीर्दीने मोठे शिखर गाठले आहे. तमिळनाडूतील द्रमुक आणि अण्णाद्रमुक या प्रस्थापित पक्षांच्या वर्चस्वाला आव्हान देत विजयचा 'TVK' पक्ष आता सत्तेच्या उंबरठ्यावर उभा आहे.
Web Summary : Actor Vijay's political rise coincides with a viral photo from his parents' remarriage. His party, TVK, achieved significant electoral gains in Tamil Nadu. Personal challenges arise amid success with divorce rumors circulating after 27 years of marriage.
Web Summary : अभिनेता विजय का राजनीतिक उदय उनके माता-पिता के पुनर्विवाह की एक वायरल तस्वीर के साथ मेल खाता है। उनकी पार्टी, टीवीके ने तमिलनाडु में महत्वपूर्ण चुनावी लाभ प्राप्त किया। सफलता के बीच व्यक्तिगत चुनौतियाँ उत्पन्न होती हैं, 27 साल बाद तलाक की अफवाहें फैल रही हैं।