Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंडप सजला,विद्यूत रोषणाई झाली; लग्नाच्या चर्चेदरम्यान विजय देवरकोंडाचं हैदराबादमधील घर सजलं, व्हिडीओ आला समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:23 IST

आकर्षक रोषणाई अन्...; विजय देवरकोंडाचं हैदराबादमधील घर सजलं, लग्नाच्या चर्चेदरम्यान व्हिडीओ व्हायरल 

Vijay Deverkonda : गेल्या काही दिवसांपासून सिनेइंडस्ट्रीत साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) आणि रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. लग्नाची तारीख जवळ आली तरी या दोघांनी आपलं नात्याची कबुली दिलेली नाही. मिडिया रिपोर्टनुसार, लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान, विजय देवरकोंडाच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील घराचा व्हिडीओ समोर आला आहे. एकीकडे लग्नाच्या चर्चा असताना अभिनेत्याचं राहतं घर फुले आणि आकर्षक रोषणाईने सजवलेलं दिसत आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

लग्नपत्रिकेचा फोटो झालेला व्हायरल...

अलिकडेच, विजय देवरकोंडाचं नाव असलेलं एक लग्नाचं कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. ज्यामुळे त्याच्या लग्नाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरु लागल्या. नुकताच 'Instantbollywood' च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  ज्यामध्ये विजय देवरकोंडाच्या हैदराबाद मधील घराची दुश्ये पाहायला मिळत आहेत.  इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, विजय आणि रश्मिकाच्या लग्नाची तयारी आधीच सुरू झाली आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि अफवांमुळे हे दोन्ही स्टार्स त्यांच्या आयुष्यातील हा क्षण अतिशय खाजगी ठेवू इच्छितात. शिवाय, येत्या २६ फेब्रुवारीला हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहून त्यांचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत.

लग्नात सेलिब्रिटींना नो एन्ट्री... 

रश्मिका-विजय लग्न हे अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या लग्नात कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना आमंत्रण देण्यात आलं आहे. रश्मिका-विजयच्या लग्नात एकही सेलिब्रिटी दिसणार नाहीये. या लग्नासाठी सेलिब्रिटींना बोलवण्यात आलेलं नाही. तसंच रश्मिका-विजयच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. रश्मिका-विजयच्या लग्नसोहळ्यात नो फोन पॉलिसी आहे. त्यामुळे लग्नातील पाहुण्यांना फोन वापरता येणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार,  विजय-रश्मिका यांचं वेडिंग रिसेप्शन कृष्णा बंजारा हिल्स हैदराबाद येथे होणार आहे. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनचं आमंत्रण अनेक सेलिब्रिटींना देण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून रश्मिका-विजय रिलेशनशिपमध्ये आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vijay Deverakonda's Hyderabad home decorated amid wedding rumors with Rashmika.

Web Summary : Amidst wedding speculations, Vijay Deverakonda's Hyderabad home is adorned with lights and flowers. Reports suggest a February wedding with Rashmika Mandanna, though the couple remains private. A no-phone policy is expected at their intimate wedding.
टॅग्स :विजय देवरकोंडारश्मिका मंदानासेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओ