Join us
Daily Top 2Weekly Top 5

अडचणी संपेनात! प्रदर्शनापूर्वीच थलपती विजयच्या 'जन नायगन' सिनेमाला मोठा झटका, काय घडलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:05 IST

प्रदर्शनापूर्वीच लीक झाला थलपती विजयचा बहुचर्चित ‘जन नायगन’ सिनेमा! अभिनेत्याने दिला कारवाईचा इशारा

Thalapathy Vijay: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय हा त्याच्या अभिनयासह चित्रपटांसाठी देखील ओळखला जातो. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.राजकारणी थलपती विजय हा मागील काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे.तसेच अभिनेता त्याचा शेवटचा सिनेमा म्हणून घोषित केलेल्या  'जन नायगन' या चित्रपटामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.थलपती विजयची शेवटचा सिनेमा 'जन नायगन' रिलीज होण्याच्या वाटेवर आहे. पण आता या चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी निर्मात्यांना काळजीत टाकणारी आहे.

प्रदर्शनापूर्वीच थलपती विजयचा 'जन नायगन' चित्रपटाच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण, हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याची माहिती मिळते आहे.  थलपती विजयने यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे. दरम्यान, याबाबत विजयने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत म्हटलंय, "जन नायगनची लीक झालेली क्लिप शेअर करणाऱ्या सर्व अकाउंट्सविरुद्ध सायबर गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिकारी यात सामील असलेल्या प्रत्येक आयडीचा शोध घेत असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल." याआधी देखील अनेक सिनेमे ऑनलाईल लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठं नुकसान झालं. सिनेमा ऑनलाईन लीक झाल्यानंतर प्रेक्षक थिएटरमध्ये जाण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळे कुठेतरी याचा आर्थिक फटका हा निर्मात्यांना बसू शकतो.

'जन नायगन' ला अजून CBFC कडून प्रमाणपत्र मिळालेले नाही, परंतु चित्रपटातील पाच मिनिटांपेक्षा जास्त फुटेज ऑनलाइन लीक झाले असून ते अनेक अकाउंट्सद्वारे प्रसारित केले जात आहे. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या क्लिपमध्ये विजयचे काही अॅक्शन सीन्स आणि अन्य काही  सीक्वेंस देखील पाहायला मिळतायत.काहींनी तर असा दावा केला आहे की, त्यांना केवळ पाच मिनिटांची क्लिपच नव्हे, तर सिनेमातील सर्वच दृश्यं ऑनलाइन व्हायरल झाल्याची दिसत आहेत. 'जन नायगन'च्या  बऱ्याच क्लिप्स प्रसार माध्यमाध्यमांवर लीक झाल्या होत्या, मात्र त्यापैकी काही नंतर काढून टाकण्यात आल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Thalapathy Vijay's 'Jananayagan' faces leak before release, trouble mounts.

Web Summary : Thalapathy Vijay's upcoming film 'Jananayagan' has been leaked online before release, causing concern for makers. Vijay's team has filed a cybercrime complaint and is taking strict legal action against those sharing leaked clips.
टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीसिनेमा